चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा भंडाराची मासिक सभा नियोजनानुसार सपन्न झाली.सभेचे अध्यक्ष माधवराव फसाटे होते.
या सभेला संघटनेचे कार्याध्यक्ष श्री रामभाऊ येवले, उपाध्यक्ष श्री रामदासजी डोकरीमारे, कोषाध्यक्ष श्री अरविंदजी चिखलीकर,सल्लागार श्री अतुलजी वर्मा,सचिव श्री.रत्नाकरजी तिडके,सल्लागार श्री शिवरामजी भोयर,श्रीविजेंद्रालाल शिल हजर होते.
सभेत संघटनेच्या कार्याचा आढावा मा सचिवांनी सादर केला. मा शिवरामजी भोयर यांचा त्यांचे वयाचे ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.संघटना कार्यकारिणी कार्याध्यक्ष श्री रामभाऊ येवले यांनी त्यांच्या इतर संघटनांमधील व्यस्ततेमुळे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे सदर रिक्त पदी सक्रिय सल्लागार मा अतुलजी वर्मा यांची संघटना कार्याध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली व श्री रामभाऊ येवले यांची निवड मुख्य सल्लागार म्हणून करण्यात आली. मा अतुलजी वर्मा संघटना कार्याध्यक्ष, व मा रामभाऊ येवले संघटना मुख्य सल्लागार म्हणून त्यांचा कार्यभार सांभाळला.
कार्यकारी मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले. व त्यांच्या भावी कार्यासाठी त्यांना शुभ कामना देण्यात आल्या. मा सचिवांनी (श्री तिडके साहेब) आभार मानले.
मा जिल्हा प्रतिनिधी/ वार्ताहर
0 टिप्पण्या