Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचा दणका ; VBA च्या पाठपुराव्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (वॉर्ड क्रमांक १५०) येथील रस्त्याचे काम प्रलंबित होते. पावसाळा सुरू झाल्यानंतरही रस्त्याचा मोठा भाग डांबरीकरणा अभावी बीएमसीकडून तसाच ठेवण्यात आला होता, ज्यामुळे नागरिकांना खड्डे, पाणी साचणे, वाहतुकीची गैरसोय यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

या समस्येचा आढावा घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी – चेंबूर तालुकाच्यावतीने रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, यासाठी मुंबई महानगरपालिका एम. पश्चिम विभाग येथे सातत्याने निवेदने व पत्र व्यवहार करण्यात आले. ६ जून २०२५ रोजी एम. पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त मा. श्री. शंकर भोसले सर यांची अधिकृत भेट घेण्यात आली. 

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश मा. महासचिव मा. सागर भाऊ गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता डांबरीकरणासह विविध जनसमस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत वंचित बहुजन युवा आघाडीने स्पष्टपणे सांगितले की, सदर कामे येत्या ८ दिवसांत पूर्ण न झाल्यास एम. पश्चिम विभागात भव्य जनआंदोलन छेडले जाईल.  या ठाम भूमिकेमुळे आणि युवा आघाडीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बीएमसी प्रशासनाने तात्काळ दखल घेत सदर रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले आहे आणि ते  पूर्णही झाले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी चेंबूर तालुका अध्यक्ष मा. स्वप्निल गायकवाड यांच्या नेतृत्वात 
राहुल सुरडकर, साईराज सदाफुले, बिपिन सावंत, भगवान सुरडकर, रुपाली मोरे, राहुल म्हस्के, प्रशांत उबाळे, सुमित वाघमारे, योगेश गायकवाड, स्वप्निल भिसेआदी पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच स्थानिक जनतेने मोलाचे योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या