चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : अहले सुन्नत वल जमातचे मुफ्ती आझम गुलाम मुस्तफा यांचे काल अकोला येथे रात्री निधन झाले. आज त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये हजारो लोकांसोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सामील झाले होते.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी मुफ्ती आझम गुलाम मुस्तफा यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. यावेळी मुफ्ती आझम गुलाम मुस्तफा यांचा मुलगा व भाऊ व यांना जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मुफ्ती आझम गुलाम मुस्तफा साहिब यांच्या दुःखद निधनाने फार मोठी हानी झाली असून वंचित बहुजन आघाडी आपल्या दुःखामध्ये सामील असल्याचे सांगितले.
यावेळी मुफ्ती आझम गुलाम मुस्तफा साहेब यांच्या नातेवाईक व मौलवी साहेब आणि अकोला पश्चिम शहर अध्यक्ष कलीम खा पठाण, कार्याध्यक्ष मजहर खान, गजानन गवई, अलीमुद्दीन साहेब, प्रदीप शिरसाट, प्रदीप पळसपगार, संजय किर्तक, डॉक्टर राजुस्कर, संदीप शिरसाट इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या