सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- समाजात वाढणारे अपघात व रक्ताची आवशकता असणारे वाढते आजार यामधे व रक्ताची वाढती गरज या पार्श्वभूमीवर एक सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून म्हणून जामखेड मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, आय लव नगर व Aimra यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १३ जुलै रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकुण ६५ रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले जामखेड शहरातील बीड रोड कॉर्नर येथील दुर्गा मोबाईल शाॅपी शेजारी हाॅल मध्ये हा रक्तदान शिबीराचा उपक्रम संपन्न झाले. जामखेड मोबाईल रिटेल विक्रेते ,डिस्ट्रीब्यूटर ,बजाज ,टीव्हीएस फायनान्स,जिवो, वी, एअरटेल, बीएसएनएल फिल्ड ऑफिसर यांचा शिबिराच्या आयोजनात विशेष सहभाग होता.
यावेळी जामखेड मोबाईल असोसिएशनचे विजय आहुजा, सुनिल जगताप, संतोष नवलाखा,सूंदर परदेशी, बापू कुलकर्णी, देविदास गोरे,शुभम बनकर, अनिल गळगटे, , मनोज आंधळे, संदिप लटके, संदिप खैरे,राज माने, करण गुलाटी, गहिनीनाथ वीर, पवन कांकरिया, श्रीकांत गोबरे,आसिफ सय्यद, वैभव भंडारी, अजय भोसले, संदेश घायतडक, सलमान शेख, सचिन डोंगरे, सतिश काळे,समीर मणियार, ऋषी लांडगे, गोविंद साठे आदि मोबाईलचे दुकानदार उपस्थित होते.
सुरभी बल्ड सेंटर चे डॉ. राजेंद्र पवार, विकास जरे ,शुभम खिल्लारी, सोनिया शितोळे, माधुरी हिवाळे, अशोक विघ्ने रक्तदान करण्यासाठी यांनी विशेष परिश्रम घेतले.
रक्ताने माणुसकीचे नवे नाते जोडणाऱ्या या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा आणि आपल्या मित्र परिवारालाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करा. असे आवाहन आयोजकांच्या वतीने जामखेड मोबाईल रिटेलर्स असोसिएशन यांनी केले होते त्यास प्रतिसाद देत ६५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन मोठा प्रतिसाद दिला.तसेच असोसिएशन च्या वतीने असे विविध उपक्रम राबविले जातात.
0 टिप्पण्या