Ticker

6/recent/ticker-posts

डास प्रतिबंधक फवारणी कराहाळीकरांची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-सध्या अधून-मधून पाऊस पडत असल्याने गावातील विविध भागात विविध जातींचे झाडे,झुडपे वाढलीत तसेच सखल भागात पाणी,चिखल साचते.तसेच गटारी तुंबलेल्या आहेत म्हणुन डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने डासांच्या दंशामुळे जीव घेणे आजार होऊ शकतात.म्हणुन गावात डास प्रतिबंधक फवारणी करावी,डेंगू,मलेरिया सारख्या डेंजर रोगांचा गावात फैलाव होणार नाही. याची खबरदारी ग्रा.पं.प्रशासनाने घ्यावी,अशी जनतेची मागणी आहे. ग्रा.पं.च्या हम करे सो ... या प्रमाणे चालत असलेल्या मनमानीपणामुळे हाळीत विविध समस्यांचे साम्राज्य पसरले आहे.यात गावात सर्वदुर पसरलेली अस्वच्छता व दुर्घंधी ! तसेच तुंबलेल्या गटारी आणि जागो जागी वाढलेले गवत.यामुळे गावभर घाणवास पसरुन डासांचा गोंगाट सुरु झाल्याचे सामान्य जानतेला दिसते.पण प्रशासनाला दिसत नाही. तसेच गावात जीवघेणा साथीचा आजार फैलावल्यावरच प्रशासनाचे डोके ठिकाणावर येणार आहे,का ?  पावसाळा सुरु होण्यापुर्वी गटारी साफ करणे बंधनकारक असते. माञ,येथे गटारी साफ केल्याचे दिसत नाही.आणि जर गटारी साफ केल्या असत्या तर दि,२१ व २२जुलै च्या मध्यराञी पडलेल्या पावसाचे व गटारीतील पाणी वार्ड क्र.३ सोनार गल्ली व कांही मातंग समाजबांधवा- च्या घरात पाणी शिरले असते का ? गटारी साफ करण्यासाठी जो कांही फंड असतो.कागदोपञी गटारी साफ करवुन तो फंड प्रशासनाने ओम फट स्व:हा ! तर केला नाही.ना ? असे प्रश्न सुज्ञ हाळीकरांना पडले आहेत. हाळीत विविध ठिकाणी खड्यांमध्ये जमा झालेले घाण पाणी,वाढलेले गवत व झाडी आणि तुंबलेल्या नाली यामधून डेंगू,मलेरिया,चिकन गुनिया या सारख्या गंभीर आजाराचा फैलाव करणा-या डासांची पैदास होऊ शकते.आणि अशा डासांनी दंश केलेल्यांना अशाप्रकारचे आजार होऊ शकतात.अशी भीती जाणकार मंडळीमधून व्यक्त होत आहे.तरीही ग्रा.पं.प्रशासनाला याचे ना सुख व ना दु:ख ! यामुळे घरोघरी डासं राज्य करी ! असे चिञ हाळी मध्ये दिसते. डासांसह घाणींचे साम्राज्य परसले असल्याने याचा सर्वाधिक फटका व ञास नवजात शिशू व बच्चे कंपनींना सहन करावा लागत आहे.तेंव्हा याचा उद्रेक व्हायची वाट न बघताच हाळी गावच्या (अ) कुशल कारभा-याने गावात डास प्रतिबंधक फवारणी करावी,अशी जनतेची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या