चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज : राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथे विजय चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शिवकीर्ती युवा मंचाचे अध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक जाणिवेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या प्रेरणेतून आणि पुढाकारातून ४१७ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करत उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, बागेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णराज माने पाटील, फातिमा पाटावाला, शशिकला भरते, सुनीता फुले, पायल मोरे, सतीश व्होरा, राहुल मोरे, राहुल जगताप, राजेंद्र काकडे, मच्छिंद्र पगारे, दादा तांबोळी, झुलकर शेख, बाळासाहेब वाईकर डॉ.संतोष खडतरे, डॉ.अजित गांधी यांच्यासह अकलूज आणि परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, व्यापारी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण रक्तदान शिबिर अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
रक्तदान शिबिराचे संयोजन हे आरोग्य विषयक जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. तरुण पिढीमध्ये समाजकार्याची भावना रुजवणारा हा उपक्रम संपूर्ण अकलूजमध्ये चर्चेचा विषय ठरला.
शिबिरात सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच ऊर्जा व पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेच्या वतीने उपस्थित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
“रक्तदान म्हणजे दुसऱ्याला नवजीवन देण्याचे कार्य असून, प्रत्येकाने नियमितपणे रक्तदान करण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन यावेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले.
तसेच, आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत सांगितले की, “देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण सर्वांनी समाजहिताचे कार्य करणे हेच त्यांना खरी वाढदिवसाची भेट ठरेल.”
0 टिप्पण्या