चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-गुरू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ, जीवनात ज्ञान व योगसाधनेचा प्रकाश देणारा मार्गदर्शक. अशा महान गुरूंना वंदन करण्यासाठी पतंजली महिला योग समिती, जिल्हा भंडारा यांच्या वतीने गुरूपौर्णिमेनिमित्त एक प्रेरणादायी आणि संस्कारक्षम विशेष कार्यक्रमाचे आयोजन राधास्वामी मंदिर खात रोड भंडारा येथे आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भक्तिभावाने झाली. महिला प्रभारी सौ. वैशालीताई गिरीपूंजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत गुरूपौर्णिमेचे महत्त्व उलगडले आणि महिला योग समितीच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे संचालन कल्पनाताई चांदेवार यांनी अत्यंत सुव्यवस्थितरीत्या पार पाडले.
स्वागतगीत मंजुषाताई , वंदनाताई,रजनी,प्रतिज्ञा टेंभरे यांनी मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण केले.
कार्यक्रमात योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक योग शिक्षकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. प्रणाली सावरकर, रीता निर्वाण, प्रीती डोंगरवार यांच्यासह अनेक योग शिक्षकांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या वेळी संघटन विस्तार, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, व पदाधिकाऱ्यांच्या योग प्रवासाबाबत सविस्तर मार्गदर्शन महाराष्ट्र पूर्व राज्य प्रभारी आदरणीय संजीवनी माने यांनी केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य संचारले.
तसेच राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. कांचनताई यांनी आपल्या भाषणात जिल्हा व तहसीलस्तरावरील महिला योग कार्यकर्त्यांचे कौतुक करत सांगितले की, “भंडारा जिल्ह्याच्या महिला योग शिक्षिका निशुल्क योग कक्षेचा विस्तार, व योग शिबिरे लावतील येणाऱ्या काळात हे योग कार्य निश्चितच दुपटीने वाढेल.” अशी ग्वाही दिली.
यज्ञ हवन विधी कार्यक्रम अनिताताई खेडीकर आणि मंजुषाताई डवले यांनी संपन्न केला. या कार्यक्रमाला. सौ. उषाताई,खोब्रागडे सर,तिडके सर ई ची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी अनिताताई यांनी आभारप्रदर्शन करत सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
मा.जिल्हा प्रतिनिधी /वार्ताहर
0 टिप्पण्या