चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : बाबुपेठ चंद्रपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते माधवराव भगवान येसेकर यांचे वयाचे ८५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाल्यावर त्यांचे व कुटुंबियाचे इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले. पारंपरिक विधींना फाटा देत त्यांच्या अस्थी गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात विसर्जित करून दि.२जुलै रोजी आप्त-स्वकीय नातेवाईकांना एकत्रित करून चौदावीचा कार्यक्रम महादेव मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता वाचन, भजन व नेत्रदान, देहदान महत्व प्रबोधन , श्रद्धांजली ई. चे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी अ.भा. अं. नि. स. चंद्रपूरच्या वतीने देहदानाचा संकल्प करणाऱ्या बाबुपेठ निवासी पल्लवी खोब्रागडे यांचा सत्कार शारदा हस्तक यांचे हस्ते तथा सुनंदा माधवराव येसेकर व कुटुंबाचा सत्कार गुरुदेव प्रेमी बापुरावजी दर्वे यांचे हस्ते मरणोपरांत सन्मानपत्र, शाल पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. हा कार्यक्रम अ. भा. अं. नि. स. चंद्रपूरचे कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने, सामाजिक कार्यकर्ते दशरथ हस्तक यांचे मार्गदर्शनात नाभिक महामंडळ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष रविंद्र येसेकर, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक तथा बाल कल्याण समिती सदस्या वनिता घुमे, वर्षा धाबेकर या मुलांनी घडवून आणला.यात देहदान /नेत्रदानच्या महत्वावर प्रदीप अडकिणे यांनी प्रबोधन केले. तर लांजेवार गुरुजी, बापुजी बोबडे, नत्थुजी बावणे यांनी श्रद्धांजली वाहिली. ग्रामगीता वाचन व संचालन गजानन घुमे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी बालाजी येसेकर, कैलास धाबेकर, ज्योती येसेकर,दिपक, राजेश, शैलेश, संकेत, वेदांत, स्वामी व येसेकर परिवार आणि पंकज घुमे, अक्षय घुमे, उत्कर्ष धाबेकर, जय धाबेकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली.
0 टिप्पण्या