Ticker

6/recent/ticker-posts

७ जुलैला तळोदा येथे आदिवासी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन!

शिवसेना शिंदेगटाचे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमित कार्यालय हटविण्याची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
तळोदा : तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंक च्या समोरील,तळोदा- शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदेगटाची  कार्यालय तात्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालये बांधणा-यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा ,या मागणीसाठी भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स अशा आदिवासी संघटनांकडून दिनांक ७ जूलै  २०२५ रोजी सकाळी ११ वाजता  फाॅरेस्ट नाका संत गुलाम महाराज प्रवेश द्वार तळोदा येथे तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा व पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तळोदा यांना संघटनेकडून देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,सुनिल पवार कार्यकर्ता शहादा ,दिलीप महिरे,धडगांव तालुकाध्यक्ष विकास वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    भारत आदिवासी संविधान सेनेकडून दिनांक १७ जून २०२५ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा यांना निवेदन देऊन तळोदा येथील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदेगटाचे कार्यालय तात्काळ हटवा,मागणीचे निवेदन देण्यात आले होते.२० दिवस झाले तरी अद्याप नगरपरिषद प्रशासनाने तळोदा येथे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर कार्यालय बांधणा-यांना साधी नोटीस सुद्धा पाठवली नाही.आमच्या लोकांना साधे घर बांधायला जागा नाही.या रस्त्यावर बांधलेल्या कार्यालयात वीज कोण पुरवतो,पाणीपुरवठा कोण पुरवठा करतो,याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे,अशी प्रतिक्रिया भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे.
                 भूमाफिया, आदिवासींचा जमीन लुटारू शिवसेना शिंदेगटाचे चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर रित्या हडप केल्या आहेत. हे प्रकरण सुरू असताना शिवसेना शिंदेगटाचे तळोदा येथे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून कार्यालय बांधून रहदारीला अडचण करून ठेवली आहे,प्रवाशांना त्रास दिला जात आहे.मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा हे पुढा-यांच्या दबावाखाली काम करत असतील तर त्यांनी आपली खुर्ची सोडावी.साधी नोटीस मुख्याधिकारी देत नसतील तर ते असक्षम अधिकारी आहेत, त्यांना खर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.रास्ता रोको आंदोलनात आम्ही शिवसेना शिंदेगटाच्या कार्यालयाचे विरोध करूच, त्याचबरोबर या निष्क्रीय अधिकाऱ्यांचाही विरोध करणार आहोत.या रास्ता रोको आंदोलनात सर्व आदिवासी बांधवांनी व सर्व सामान्य लोकांनी मोठ्यात मोठ्या संख्येत उपस्थित राहावे,असे आवाहन आम्ही आदिवासी संघटनांकडून करत आहोत,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या