✍️ भवन लिल्हारे उपसंपादक महाराष्ट्र राज्य मो.नं. 9373472847
भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा धोप येथे दिनांक ११ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय धाप येथे प्रकल्प दिशा उपक्रमांतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
प्रकल्प दिशा उपक्रमांतर्गत प्रमुख अतिथी म्हणून मा. राठोड साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन आंधळगाव यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले . मार्गदर्शन करतानास्पर्धा परीक्षा हा महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि युवकांसाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. ज्याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या करिअरच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता येतो. विविध शासकीय आणि खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी या परीक्षांची गरज असते. हे परीक्षा केवळ ज्ञानच नव्हे तर तर्कशक्ती, बुद्धिमत्ता आणि मानसिक तयारी यांची देखील कसोटी घेतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या परीक्षांचा फार मोठा फायदा होतो.
स्पर्धा परीक्षांचे महत्त्व
स्पर्धा परीक्षा विविध कारणांसाठी महत्त्वाच्या ठरतात:
करिअर संधी: शासकीय आणि खाजगी क्षेत्रात उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा अनिवार्य असतात.
व्यक्तिमत्व विकास: या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमता, तर्कशक्ती, आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता वाढते.
ज्ञान आणि माहितीची वाढ . आणि सातत्य शिकावे लागते. तसेच विध्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी उपस्थित मा. श्री. जगदीश्वरजी शेंडे सभापती पं. स. मोहाडी, , श्री. सुरेशजी शेंडे माजी सैनिक, श्री. शाम शेंडे उपसरपंच धोप, विकासजी शेंडे ग्रा.पं.सदस्य, शिवदासजी चवळे ग्रा.पं.सदस्य, गजाननजी सोमनाथे, महेंद्रजी मेश्राम, रामरावजी मंढारी, विजयजी निमकर, राजेशजी आग्रे गजाननजी शेंडे तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते...
0 टिप्पण्या