Ticker

6/recent/ticker-posts

खबरदार, हाळी-हंडरगुळीत राञी १० नंतर फिरणा-यांवर कारवाई


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-सार्वजनिक शांतता भंग करत राञी बेराञी फिरणा-या टोळक्यांमुळे सुज्ञ हाळी-हंडरगुळीकर वैतागले असून अशा टोळक्यांना आजवर कुणी ही कायद्याचा हाबाडा दिला नाही.तो द्यावा,अशी अपेक्षा सामान्य जनतेची आहे.आणि आता जनतेची ही इच्छा लवकरच पुर्ण होऊ शकते.
कारण,अमोल तांबे (पोलिस प्रमुख), मंगेश चव्हाण{अप्पर पोलिस प्रमुख}  यांच्या आदेशानुसार शहरांसह गाव खेड्यात राञी १० नंतर विनाकारण फिरणा-या व शांतता भंग करणा-या टोळक्यावर कारवाई करण्यात येत आहे.आणि आता यापुढे राञी १० नंतर विनाकारण फिरणा-या तसेच गोंगाट करणा-या हाळी हंडरगुळी येथील त्या टोळक्यावर कायद्याचा हाबाडा देण्यासाठी वाढवणा पोलिस सज्ज झाले आहेत.अशी माहिती या प्रतिनिधीशी बोलताना कर्तव्यकठोर सपोनि.सुनिल गायकवाड यांनी दिली आहे. हाळी-हंडरगुळीकरांची झोप मोड करुन सार्वजनिक शांतता भंग करणा-या टोळक्यावर खरचं कारवाई होणार का?याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
कारण,आजवर येथे कुणीही कसली ही कारवाई करण्याचे धाडस केले नाही.म्हणुन बहूतांश गल्लीबोळ, ग्रा.पं.काॅम्पलेक्स,छ.शिवाजी चौक, बाजार पेठ,मंदीर आदी परिसरामध्ये मदिरा प्रेमींसह बर्थ डे साजरा करत असलेले कांही टोळके धांगडधिंगाना (अर्धनग्न डांन्स) करतात.आणि या टोळक्यांचा नवजात बालकांसह जेष्ठ नागरिकांना हकनाक ञास होत आहे  म्हणुन अशा टोळक्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.अन्यथा शांतता प्रिय गावात अशांतता पसरायला वेळ लागणार नाही!अशी भीती सुज्ञ हाळीहंडरगुळीकरांतून वर्तवली जाते  राञी दहा नंतर विनाकारण फिरणारे लोफर,मदीरा प्राशन करुन बर्थ डे च्या नावाखाली धिंगाना करणा-या टोळक्यांना कायद्याची सुंदरी/काठी दाखविण्यासाठी लातुरचे एस.पी. अमोल तांबे यांच्या सुचनेनुसार शहर व ग्रामीण भागात राञी विनाकारण हिंडणा-यांवर तसेच उशीरा प्रयन्त उघडे असलेले हाॅटेल्स,दुकाणे,पान टप-या यांच्यावरही कारवाईची मोहिम सुरु केली आहे.

वरिष्ठांच्या सुचनेनुसार वाढवणा पो.स्टे.हद्दीतील गावागावांमध्ये
राञी-बेराञी सार्वजनिक शांतता भंग करणा-या टोळक्यावर तसेच उशीरा पर्यंत हाॅटेल,दुकाणे,टप-या उघडी ठेवणा-यांवर कारवाई केली जाईल.तसेच दारु सेवन करुन गाडी चालविणा-यांची आणि विनाकारण १० नंतर रोडवर हिंडणा-यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
सपोनि.सुनिल गायकवाड,वाढवणा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या