Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठल नामाच्या गजराने अवघी दुमदुमली हाळी-हंडरगुळी नगरी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी llदि.६रोजी आषाढी एकादशी निमित्त  येथील विविध देवालयात धार्मिक कार्यक्रमाचे व मारोती मंदीरात शाबू व केळी वाटपाचे आयोजन केले होते स.७वा.मारोती मंदीरापासून हंडरगुळीतील शेकडो महिला,पुरुष भक्तांनी डोईवर तुळस घेत गावातील प्रमुख मार्गावरुन 'विठ्ठल,विठ्ठल, विठ्ठला हरिओम विठ्ठला'चा टाळ- म्रदंगाच्या व फटाकांच्या आतषबाजी त गजर करत मिरवणुक काढली.
यावेळी बालभक्त मोठ्या रुबाबात भगवे ध्वज खांद्यावर घेऊन आल्याने हंडरगुळी नगरीत एकप्रकारे भगवे वादळ आल्याचे दिसत होते.तसेच दिंडी मार्गावर दुर्तफा काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या मन वेधत होत्या.
तसेच शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी ही विविध देवी,देवतांची वेशभुषा करत मारोती मंदीर ते पाटील(जुनीबाजार) गल्ली,साठे चौक,बस्वेश्वर चौक, छ. शिवाजी चौक ते मारोती मंदीर अशी दिंडी काढली.यावेळी शालेय मुलांनी डोईवर गांधी टोपी,गळ्यामध्ये टाळ, भाळी अष्ठगंध आणि मुलींनी साडी अशाप्रकारे पारंपारिक वेशभुषा करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडी मध्ये महिलांच्या डोईवर तुळशीपाञ व कांहीच्या हाती शेकडो भगवे ध्वज डोलात फडकत होते.
सबंध गाव विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले होते.म्हणुन हंडरगुळी नगरीत प्रति पंढरपुर अवतरल्याचे जाणवत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या