Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी संघटनांचा दणका; तळोदा येथील शिवसेना शिंदेगट कार्यालय हटविण्यासाठी मुख्याधिकारी यांची नोटीस!

रास्ता रोको आंदोलन स्थगित,१५ दिवसांत अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटम!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
तळोदा : तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंक समोरील तळोदा -शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदेगटाचे कार्यालय तात्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालय बांधणा-यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा,या मागणीसाठी आदिवासी संघटनांकडून ७ जुलै २०२५ रोजी रास्ता रोको आंदोलन करणार होतो.परंतू मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा यांनी शिवसेना शिंदेगट कार्यालय प्रमुख तळोदा यांना दिनांक ४ जुलै २०२५ रोजी नोटीस पाठवली आहे महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १७९ अन्वये व महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ कलम ५२,५३,५४ नुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.नोटीसीत १५ दिवसांच्या आत स्वतःच्या खर्चाने अतिक्रमण काढून टाकावे,असे  निर्देश दिले आहेत.
                       आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर रित्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप केल्या आहेत, म्हणून या नंदूरबार जिल्ह्य़ात आम्ही फक्त चंदूभैयाचाच विरोध करतो.नगरपरिषद ने शिवसेना शिंदेगट कार्यालयालाच नोटीस पाठवणे आवश्यक होते.परंतू त्यांनी सरसकट सर्वच अतिक्रमण धारकांना नोटीस पाठवली आहे.बाकींच्यांना नोटीस पाठवा,हा आमचा विषय नव्हता,परंतू सर्वांनाच नोटीस पाठवून हे राजकीय षडयंत्र सुरू केले आहे.नोटीसीद्वारे  सामान्य लोकांना भडकावण्याचे काम सुरू आहे,त्या षडयंत्राला बळी पडू नये.
नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करण्यासाठी आम्ही दिनांक ७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता  फाॅरेस्ट नाका संत गुलाम महाराज प्रवेश द्वार तळोदा येथे आदिवासी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
                  आम्ही फक्त तळोदा  येथील शिवसेना शिंदेगटाचे अतिक्रमित कार्यालय हटवा,अशी मागणी केली होती,परंतू नगरपरिषद प्रशासमाने सर्वच अतिक्रमण धारकांना नोटीसा पाठविल्या आहेत.आम्ही जे गोर गरीब जनता आहे,हात मजूरीवर पोट भरतात, त्यांना विरोध करत नाहीत. आमच्या आदिवासी समाजाच्या जमिनी ज्यांनी हडप केल्या आहेत, त्या भूमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांचाच आम्ही विरोध करतो.जर तळोदा येथील शिवसेना शिंदेगटाचे कार्यालय येत्या १५ दिवसांत हटविले नाहीतर १६ वा दिवस आमचा असेल, असा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या