Ticker

6/recent/ticker-posts

टिळक विद्यालय येथे लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा  :-टिळक विद्यालय खंडाळा तालुका साकोली येथे आज दिनांक 23 जुलै 2025 लोकमान्य बाल गंगाधर टिळक व स्वातंत्र्य चळवळीतील एक महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीचा संयुक्तरीत्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
          सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एन. निर्वाण सर,यांनी बाल गंगाधर टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी. एन. कापगते, डी.डी. तुमसरे, बी. एस. बडवाईक, इत्यादी उपस्थित होते.
        यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक पी.एन. कापगते विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना लोकमान्य टिळक यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि मी तो मिळवणारच" अशी सिंहगर्जना करून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहन दिले, असे मार्मिक विचार कापगते सरांनी ठेवले.
          विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एन. निर्वाण सर म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी राजकीय जनजागृतीच्या माध्यमातून व जनतेमध्ये एकता घडविण्याच्या दृष्टिकोनातून गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक रित्या कार्यक्रम सुरू करून ब्रिटिशांविरुद्ध जनतेला उभे राहण्यासाठी जागृत करणे हा मुख्य उद्देश होता. असे मौलिक विचार निर्वाण सर यांनी व्यक्त केले.
          याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जीवन चरित्रावर आधारित गीत, भाषणे सादर केलेत.
          कार्यक्रमाचे संचालन कु. एम.डी. मेश्राम मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन  पी. ए. काशीवार सर यांनी केले.
         कार्यक्रमाचे यशस्वीते करिता पी.एस. मुगुलमारे, एन. डि. टेंभुर्णे, एस. एम. मेंढे, डि. एम. रोकडे इत्यादी कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या