Ticker

6/recent/ticker-posts

परदेश दौ-याचा शेतकरीबंधू व भगीनींनी लाभ घ्यावा; एम.डी.कांबळे,शेतकी अधिकारी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :- जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना जग पाहण्याची म्हणजे शेतातील प्रगत तंञज्ञानांची माहिती व्हावी,यासाठी परदेशात जाण्याची संधी शासनाने उप्लब्ध करुन दिली आहे.तेंव्हा या संधीचे सोने करण्यास शेतकरीबांधवानी २३ जुलै २५ पर्यंत तालुका शेतकी विभागात संपर्क करुन अर्ज सादर करावेत.अशी विनंती वजा आवाहन उदगीरचे शेतकी अधिकारी एम.डी.कांबळे यांनी 'दिव्य मराठी' शी बोलताना केले आहे.
विविध प्रकारच्या विकसित आणि आधुनिक तंञज्ञानाच्या शेतीचे ज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठी शेतक-यांचे परदेश अभ्यास दौरे सन.२५-२६ ही योजना राबविली जात असून यामध्ये युरोप,नेदरलॅंड,जर्मनी,जपान,चीन, स्वित्झर्लंड,फ्रांन्स,इस्ञाईल,कोरिया आदी देशात अभ्यास दौरे आयोजित केले आहेत.तेंव्हा दौ-यासाठी जे - जे इच्छूक आहेत.त्या-त्या शेतकरी बंधू भगिनींनी २३जुलै पर्यंत रितसर अर्ज  करणे गरजेचे आहे.
जगात विविध देशांनी विकसित केले असलेले शेतातील तंञज्ञान व तेथील शेतक-यांनी केलेला त्याचा वापर अन् त्या नवनवीन तंञज्ञानाद्वारे त्या त्या देशातील शेती व शेतकरी यांचा झालेला विकास तसेच उत्पादनामध्ये झालेली वाढ याबद्दल तेथील तज्ञ व शास्ञज्ञ हे शेतक-यांशी प्रत्यक्षामध्ये भेट घेऊन चर्चा करणारेत.तसेच भारतीय शेतक-यांचे ज्ञान व क्षमता उंचावणे व विकास,हा या दौ-याचा  उद्देश आहे.
राज्याकडून मिळणार ५०% अनुदान
राज्य सरकारकडून अभ्यास दौ-यास जाणा-या सर्व संवर्गातील शेतकरी बंधू,भगीनींना एकुण खर्चाच्या ५०% रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लक्ष रुपये प्रती शेतकरी.यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणुन देय आहे.तेंव्हा शेतक-यांनी बॅंकेचे खाते आधार संलग्न करुन घ्यावे.या दौर्र्यात जाणा-यांची निवड जिल्हा पातळीवरील समिती करणार आहे. लातुर जिल्ह्यासाठी ५ शेतक-यांचे भौतिक लक्षांक प्राप्त झालेले असून त्यात १ महिला शेतकरी भगीनी,१ केंद्र/राज्य शासनामार्फत विविध शेती पुरस्कार प्राप्त / पीक स्पर्धा विजेते व इतर तीन असे लक्षांक प्राप्त झाले आहेत.तेंव्हा अभ्यास दौ-यासाठी परदेशात जाण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतक-यांनी २३ जुलै पर्यंत तालुका शेतकी कार्यालय, उदगीर येथे संपर्क करावा.
एम.डी.कांबळे
उदगीर तालुका शेतकी अधिकारी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या