Ticker

6/recent/ticker-posts

२५ जुलैला आदिवासी संघटनांचे तळोदा येथे रास्ता रोको आंदोलन,मुख्याधिकारी यांच्या नोटीसला केराची टोपली

शिवसेना शिंदेगटाचे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमित कार्यालय हटविण्यासाठी आदिवासी संघटना आक्रमक!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
तळोदा: तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंक च्या समोरील,तळोदा- शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदेगटाची  कार्यालय तात्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालये बांधणा-यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा ,या मागणीसाठी भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स अशा आदिवासी संघटनांकडून दिनांक २५ जूलै  २०२५ रोजी सकाळी ११ वाजता  अमरधाम पूल तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा व पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तळोदा यांना संघटनेकडून देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,ईकबाल शेख, दिलीप महिरे,रंजीत भील,सुभाष भील, संजय भील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा यांनी शिवसेना शिंदेगट तळोदा प्रमुख यांना दिनांक ४ जुलै २०२५ रोजी नोटीस पाठवली होती.अतिक्रमणात असलेले शिवसेना शिंदेगटाचे कार्यालय स्व: खर्चाने १५ दिवसांत हटविण्यात यावे,अ अन्यथा नगरपरिषद कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसीत नमूद केले होते.परंतू अतिक्रमणात असलेले कार्यालय न हटवून मुख्याधिकारी तळोदा यांच्या नोटीसला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
                  रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का? अतिक्रमण करून वाहनांना अडथळा निर्माण करता, वाहतूक कोंडी करून प्रवाशांना त्रास देता. हे कार्यालय तुला काय तुझ्या बापालाही हटवावे लागेल, असे जोरदार प्रत्युत्तर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी शिंदेगटाच्या तळोदा  प्रमुखाला  दिला आहे.
                         भूमाफिया, आदिवासींचा जमीन लुटारू शिवसेना शिंदेगटाचे चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधानपरिषद सदस्य यांनी नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर रित्या हडप केल्या आहेत.आमचा फक्त चंद्रकांत रघुवंशी यांचाच विरोध आहे.बाकी व्यवसायकांना अजिबात विरोध नाही.मुख्याधिकारी विक्रम जगदाळे नगरपरिषद तळोदा हे चंद्रकांत रघुवंशींच्या दबावाखाली काम करत आहेत,म्हणून अद्याप अतिक्रमण हटवले नाही.आम्ही आमच्या आदिवासी स्टाईलने शिवसेना शिंदेगटाचे कार्यालय हटवू,अशी प्रतिक्रिया भारतीय आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या