👉 देशाचे ५२वे सरन्यायाशी म्हणून नियुक्ती.
👉 बॉम्बे बार असोसिएशनने आयोजित कार्यक्रमात न्या. गवई यांचा खुलासा .
मुंबई / चक्रधर मेश्राम दि. 6 जूलै 2025:-
सहा वर्षांनी सरन्यायाधीश गवईंकडून अखेर ते गुपित उघड झाले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून २०१९ मध्ये आपल्या नावाची शिफारस करण्यात आली होती. त्यावेळी, तत्कालीन न्यायवृंदातील एक न्यायमूर्ती आपल्या बाजूने नव्हते, असा खुलासा देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी सत्कार समारंभात बोलताना केला. तसेच, सहा वर्षांनंतर आपण हा खुलासा करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
देशाचे ५२ वे सरन्यायाश म्हणून नियुक्ती झाल्यानिमित्त बॉम्बे बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना न्यायमूर्ती गवई यांनी उपरोक्त खुलासा केला. गेल्या सहा वर्षांपासून आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहोत. तथापि, आतापर्यंत हे गुपित आपण कधीही उघड केले नव्हते, असे सांगताना न्यायवृंदातील त्या न्यायमूर्तींचे नाव मात्र सरन्यायाधीशांनी यावेळी उघड केले नाही.
सरन्यायाधीश नेमके काय म्हणाले ?
सर्वोच्च न्यायालयात आपल्या नावाची शिफारस केले गेली. त्यावेळी, न्यायवृंदातील एका न्यायमूर्तींना आपल्या नावाबाबत काही शंका होत्या.आपल्याला सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली तर मुंबईतील काही वरिष्ठ वकिलांमध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, असे त्या न्यायमूर्तींना वाटत होते. तथापि, बॉम्बे बार असोसिएशनच्या अनेक वरिष्ठ वकिलांनी दिल्लीत या न्यायमूर्तींची भेट घेतली आणि त्यांची आपल्याबाबत चुकीची धारणा असल्याचे त्यांना पटवून दिले. या वकिलांच्या प्रयत्नांमुळेच आपली सर्वोच्च न्यायालयात बढती झाली आणि आज आपण देशाच्या सरन्यायाधीशपदी आहोत. बॉम्बे बार असोसिशनच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आणि आपण त्यासाठी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू, अशी भावना गवई यांनी यावेळी व्यक्त केली.
आपण काय केले हे सहा महिन्यानंतरच उघड होईल.
न्याय करणे आणि घटनेचे पालन करणे हे न्यायमूर्तीचे प्रमुख कर्तव्य आहे यावर सरन्याधीशांनी यावेळी भर दिला. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिल्याचेही न्यायमूर्ती गवई यांनी सांगितले. सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आपण माध्यमांना कोणत्याही मुलाखती देण्यास किंवा सहा महिन्यांतील आपल्या कृती आराखड्याबाबत बोलण्यास नकार दिला. तथापि, आता बोलण्याऐवजी, सहा महिन्यांनंतर निवृत्त झाल्यावर आपण किती काम केले आणि त्यातून अपेक्षित साध्य केले की नाही हे कळेलच. पोकळ आश्वासने आपण देऊ इच्छित नाही आणि कोणत्याही निराशेला जागा देऊ इच्छित नाही, असेही गवई यांनी यावेळी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या