जो जास्त देणगी देईल, त्याच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन होणार!
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :- दर वर्षी शहादा येथे ९ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी गौरव दिवस आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज दिनांक ६ जूलै २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह शहादा येथे सर्व आदिवासी संघटनांची सभा आयोजित करण्यात आली .या वर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी शहादा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन करून विश्व आदिवासी दिवस कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.लोक वर्गणीतून क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक शहादा येथे उभारले जाणार आहे.स्मारकासाठी स्व ईच्छेने आर्थिक सहयोग करण्याचे जाहीर आवाहन सुनिल सुळे अध्यक्ष क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक समिती शहादा तर्फे करण्यात आले आहे. समाजाच्या विविध गटातून स्मारकासाठी देणगी मिळत आहे. जो व्यक्ती स्मारकासाठी जास्त रक्कम देणगी म्हणून सहयोग करेल,त्या व्यक्तीच्या शुभ हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारकाचे भूमिपूजन ९ ऑगस्ट २०२५ रोजी करायचे,असे सर्व आदिवासी संघटनांनी ठरवले आहे.
९ ऑगस्ट २०२५ रोजी विश्व आदिवासी दिनानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक पासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा गांधी पुतळा ,नगरपरिषदला गोलाकार फिरून स्टेट बॅन्क ऑफ इंडिया शहादा पर्यंत सांस्कृतीक देखावे, वाद्य , ढोल, बिरी , मांदल,पेपार्या आदी वाद्यसह पारंपारिक वेशभुषा पेहरावाने भव्य सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. या विश्व आदिवासी दिवस कार्यक्रमात जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी आपल्या आदिवासी वेश भूषेत सहभागी व्हावे,असे जाहीर आवाहन ९ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस समिती शहादा तर्फे करण्यात आले आहे.
या सभेला क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक समिती तथा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे सुनिल सुळे,बिरसा फायटर्सचे सुशिलकुमार पावरा, गोपाल भंडारी ,आदिवासी टायगर सेनेचे ,रविद्र ठाकरे, भारत आदिवासी संविधान सेनेचे सतीश ठाकरे,जय क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारक समितीचे मनोहर पावरा , अँड.चंपालाल भंडारी ,आदिवासी एकता परिषदेचे प्रमोद ठाकरे , अनिल चव्हाण, सुभाष नाईक ,समाजिक कार्यकर्ता तथा उपसरपंच सचिन पावरा , माजी नगरसेवक आनंद सुर्यवंशी , जय बजरंग ग्रूपचे किरण सोनवणे,एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे जुलाल अहिरे,आदिवासी क्रांती दलाचे राहूल पावरा,शबरी माता संघटनेचे प्रभू नाईक, बीटीटीएस चे राजेश मोरे,एकलव्य भील सेनेचे देवा मोरे,सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मीकांत वसावे,प्रशांत पवार, , आदि विविध आदिवासी संघटनांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या