Ticker

6/recent/ticker-posts

धडगांव पोलीस झाले चोर, लुटारू;बिरसा फायटर्सच्या दणक्याने फिर्यादीला ४३ हजार ऐवजी १ लाख रूपये मिळाले!


घर जाळल्याची तक्रार घ्यायला पोलिसांनी फिर्यादीकडून घेतले होते ४३ हजार रूपये!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
धडगांव :- "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे.या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो की,महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे.परंतू या ब्रीदवाक्याला धडगांव पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ऊलटे  करून ठेवले आहे.कारण धडगांव पोलीस ठाण्यातील पोलीस दुर्जनांचे,गुन्हेगारांचे रक्षक करतात व सज्जनांची लूटमार करण्यास कटिबद्ध आहेत. खरंच या पोलिसांत माणूसकी शिल्लक राहिली नाही का? हे माणसांचे औलाद नाहीत का?थोडी तरी लाज,लज्जा, शरम, माणूसकी, दया, माया ठेवा.खाकी वर्दीत थोडी तरी माणूसकी जीवंत ठेवा.
          धडगांव तालुक्यातील बिजरी या गांवातील फिर्यादी विलास तडवी या आदिवासी व्यक्तीचे घर खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देवू नये म्हणून संशयीत ७ आरोपींनी पेट्रोल टाकून जाळून टाकले.या आगीत विलास तडवीचा पूर्ण संसार उद्ध्वस्त,परिवार बेघर झाला. घर जाळल्याची तक्रार दाखल करून घ्यायला विलास तडवी या फिर्यादीकडून धडगांव पोलीस ठाण्यातील पोलीसांनी तब्बल ६३ हजार रूपयांची मागणी केली.नातेवाईकांकडून ऊसने पैसे व कर्ज घेऊन कशेबशे ४३ हजार रूपये जमवून पाटील नावाच्या पोलिसाला व तक्रार लिहून घेणा-या ठाणे अंमलदाराला दिले.२० हजार रूपये बाकी म्हणून पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. 
                  फिर्यादीकडूनच ४३ हजार रूपये लूटमार करणा-या धडगांव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे करण्यात आली.दत्ता पवार यांनी धडगांव पोलीस ठाण्यातील सीसीटिव्ही फुटेल तपासल्यावर पोलिसांनी फिर्यादीकडून ४३ हजार रूपये घेतल्याचे सत्य उघड झाले.पोलिसांवरची कारवाई दाबण्यासाठी संबंधित पोलिसांनी फिर्यादी विलास तडवी यांना ४३ हजार ऐवजी १ लाख रूपये देवून तोंड दाबण्याचे काम केले.१ लाख रूपये देऊन या पोलिसांनी  आम्ही चोर,डाकू, लुटारू आहोत, हे सिद्ध करून दिले.
            एक वेळ फिर्यादी तुम्हाला माफ करेल, परंतू हा सुशिलकुमार पावरा माफ करणार नाही.कारण माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य धडगांव पोलिसांनी केले आहे.तुम्हाला खाकी वर्दी घालण्याचा अधिकार नाही.पोलीस अधीक्षक नंदूरबार श्रवण दत्त यांनी या पोलिसांवर कारवाई करून नोकरीतून काढून टाकले पाहिजे,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.यापूर्वी शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील शेखर बागूल या ट्राफिक पोलिसांनी प्रवाशांकडून ९७ हजार रूपये लुटलेले पैसे बिरसा फायटर्स मुळे परत मिळाले व आता धडगांव पोलिसांकडून लुटलेले ४३ हजार रूपये फिर्यादीस परत मिळाले.बिरसा फायटर्सच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या