⭕ ओपीडी चिट्टी ८ वाजता. . आणि डॉक्टर किती वाजता.??
⭕ उपचारासाठी रुग्ण डॉक्टरची वाट पाहातात तेव्हा.. काय म्हणायचे??
चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली:- जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या अधिनस्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे सुरू असलेल्या बेजबाबदार कारभाराची प्रचिती नुकतीच उघड झाली असून हा प्रकार संबंधित वैद्यकीय अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्य कुशलता स्पष्ट करते. .
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित आणि बेजबाबदार कारभारामुळे आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांची ताटकळत वाट पहावी लागते. आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी चिट्टी सकाळी ८ वाजता पासून रुग्णांना दिली जाते मात्र डॉक्टर उपस्थित नसल्याने तब्बल दोन ..तीन तास तरी वाट पाहावी लागते. ओपीडी ची वेळ सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. परंतु डॉक्टरच वेळेत उपस्थित राहात नसल्याने रुग्णांची फारच गैरसोय होते. आणि वेळ वाया जातो. येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.
कोरेटी हे मुख्यालयी राहात नसल्याने अनेक विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश असल्याचे दिसून येत नाही. आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जनतेला दर्जेदार आणि उत्तरदायी आरोग्य सेवा वेळेवर मिळत नाही. सफाई कामगार आपल्या दैनंदिन वेळी येऊन साफसफाई करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते . तर काही खुर्ची मोडणारे ही पहायला मिळतात. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने तब्बल दोन तास तरी वाट पहात बसावे लागते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पराकोटीने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. या गंभीर बाबींकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुधारणा न केल्यास जनता वैद्यकीय अधिक्षक हटाव मोहीम राबविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात आजुबाजूच्या खेड्यातील आणि बाहेर जिल्ह्यातीलही विविध प्रकारच्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु डोळ्याचे आणि दातांचे डॉक्टर नेमके कधी येतात याचा थांगपत्ता लागत नाही. या उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने येथील आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक अनेक आजी... माजी आमदार आणि लोकप्रियता मिळवून घेण्यात अनेक राजकीय पक्षाचे अग्रेसर असणारे हे नाममात्र लोकप्रतिनिधी करतात तरी काय❓ असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0 टिप्पण्या