Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीत सेवा समाप्ती झालेल्या सुकणे सरांचा निरोप व सत्कार..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-नारायणराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित रामराव पाटील विद्यामंदीराचे विद्यार्थी व शिक्षकप्रीय मुख्याध्यापक आप्पाराव सुकणे हे ३२ वर्षांच्या सेवेनंतर कार्यमुक्त झाले म्हणुन त्यांचा सप्तनिक सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम संस्था परिसरात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन प्रविण सुरडकर गटविकासाधिकारी हे तसेच बाबासाहेब पाटील अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्यासह अनेकांनी योग्य ते मार्गदर्शन केले.तसेच सेवाकाळात केलेल्या कार्याची माहिती सत्कार मुर्ती आप्पाराव सुकणे यांनी दिली.
हाळी,हंडरगुळी,सुकणी,आनंदवाडी येथील शेकडो नागरीक या प्रसंगी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे
 नामदेव सुळे सरांनी सुञसंचालन व
उपसरपंच बालाजी भोसले-पाटील यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या