भीक नको पण कुञा आवर असे म्हणण्याची गावक-यांवर आली वेळ
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-म.गांधीनी खेड्याकडे चला,असे म्हटले होते.कारण,खेडे गावांचा विकास झाला की देशाचाही विकास होईल.असे त्यांना वाटायचे.पण
सध्या हाळी या गावात राज्य व केंद्रिय पातळीवरील विविध पक्षाचे छोटे, मोठे डझन (भारा) भर पुढारी आहेत.तरीही हाळी या खेडे गावाचा काय,किती व कसा विकास झालाय हे एक कोडेच आहे.
आज हाळीत जेवढे पुढारी आहेत, त्याच्या कैक पटीने जास्त समस्या , प्रश्न आहेत.त्यापैकी म्हत्वाचा प्रश्न म्हणजे एकही सार्वजनिक शौचालय नाही.यामुळे महिलाभगिनींची मोठी हेळसांड,कुचंबना होते.तरिही गावची सरपंच एक महिला असूनही गावात साडेचार वर्षात एकही सार्वजनिक शौचालय बांधले नाहीत.हे विशेष !! तसेच हे गावक-यांचे दुर्देवच म्हणावे लागेल.तसेच महिला सरपंच असून ही माय- माऊलींसाठी सार्वजनिक शौचालयासह इतरही अनेक ढिगभर समस्या , प्रश्न पाच ही वार्डात दिसून येतात.
हातभर काम केले तर कासराभर केल्याचा बोभाटा {बोंब} पिटणा-या, चमकोगिरी करणा-या त्या पुढा-या- मुळे गावचा विकास तर खुंटला आहे तसेच ८ कोटी रु.च्या (वाॅटर फिल्टर) जलशुद्धिकरण केंद्राच्या तसेच अन्य कामाच्या दर्जाबद्दल जनतेत शंकाच आहे.तरीही ग्रा.पं.सत्ताविरोधकासह पोस्टरबाॅय हे पण ब्र काढायला तयार नसल्यामुळे गरीब बिच्चारी जनता भीक नको पण कुञा आवर !! असे म्हणते.
0 टिप्पण्या