चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील ग्रामिण भागात ५२ गाव पाणी पुरवठा योजनासाठी व मोठे असलेला तिरु मध्यम प्रकल्प हाळी-हंडरगुळीत आहे.आणि याच प्रकल्पाची असलेल्या व प्रभू श्रीराम यांनी वनवासात असताना स्नान केलेल्या येथील तिरु नदी पाञाची आजची अवस्था ही अत्यंत वाईट झाल्याचे बघून राम तेरी तिरु नदी मैली हो गई !! असे म्हटले जाते. तेंव्हा संबंधित प्रशासनाने तात्काळ या नदीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या नदीचा नावा व्हायला वेळ लागणार नाही.
५२ गाव पाणी पुरवठा योजना ज्या तिरु प्रकल्पावर आहे.त्याच प्रकल्पा ची गावाला लागुन तिरु नदी आहे.व कधीकाळी ही नदी काळ्याभोर पाण्याने खळाळून वाहत होती.तसेच वनवासात असताना याच नदी मध्ये श्रीरामाने स्नान केल्याची अख्याईका आहे.अशा या नदीची आज निर्सगाने नव्हे तर कांही मानवाने नित्यनेमाने नदीपाञात घाण टाकूण अत्यंत गंदी अवस्था केली आहे.यामुळे तिरुनदी ही नदी न राहता गंदा नाला झालाय. याबद्दल अनेकदा लेखणीद्वारे सत्य मांडले तरीही याकडे संबंधित खाते लक्ष देत नसल्याचे दिसते.परिणामी या नदीपाञात पाण्याऐवजी नजर जाईल तिथपर्यंत घाणचघाण दिसते. आणि या घाणीची दुर्घंधी दुरवर येते. या नदीपाञातील घाणीची सचिञ बातमी विविध दैनिकाने छापल्या. तरीही याकडे प्रशासनाने अद्याप ही लक्ष दिले नसल्यामुळे या नदीचे पाविञ्य,सौंदर्य पुर्णत: धोक्यामध्ये आल्याचे दिसते.
केंद्राने देशातील नद्यांची देखभाल व संवर्धन करण्यासाठी जलशक्ती या नावाने मंञालय स्थापन केले आहे.व या मंञालयाद्वारे देशातील नद्यांच्या तसेच राज्य पर्यावरण मंञालयाद्वारे राज्यातील नद्यांचे पर्यावरण,सौंदर्य व पाविञ्य चांगले ठेवण्यासाठी देख भाल केले जाते.आणि याबाबतची घोषणा उन्हाळी अधिवेशनात मंञी पंकजा मुंडेनी केले होती.तरी पण या तिरु नदीपाञाची कांही लोकांनी केलेल्या वाईट अवस्थेकडे अद्यापही प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे या नदीबद्दल राम तेरी तिरु नदी मैली हो गई,असे म्हटले जाते.तसेच नदीचा लवकरच वासघाण गटार व्हायला वेळ लागणार नाही.तेंव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे
0 टिप्पण्या