Ticker

6/recent/ticker-posts

पवनी कडून येणाऱ्या सर्वज्ञ ट्रॅव्हल्स मिनी बस चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगय, निष्काळजीपणे व भरगाव वेगाने चालविल्यामुळे


एक्टिवा मोटर सायकल वरील आर्यन सोमेश्वर नैताम यांचा जागीच मृत्यू तर रौनक नरेश राऊत यांना
गंभीर दुखापत

पवनी ते भंडारा मा शारदा पेट्रोल पंप अड्याळ समोरील घटना

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -पवनी तालुक्यातील  अड्याळ  येथील पवनी ते भंडारा रोड मा शारदा पेट्रोल पंप अड्याळ समोर आज दिनांक 2 जुलै 2025 ला 12.15 वाजेच्या दरम्यान पवनी कडून येणाऱ्या सर्वज्ञ ट्रॅव्हल्स नावाच्या मिनी बस क्रमांक MH 31 CQ 69 91 
 चालकाने हयगईने, निष्काळजीपणे व भरगाव वेगाने चालवून अॅक्टिवा मोटरसायकल क्रमांक MH 36 AD 34 16 ला जोरात धडक मारल्याने  आर्यन सोमेश्वर नैतामे वय 16 राहणार अड्याळ त्याचप्रमाणे त्याचा मित्र नामे रौनक  नरेश राऊत वय 18 राहणार अड्याळ ला जोरदार धडक मारण्यात आल्याने ते दोघेही  सिमेंट रोडवर मोटार सायकल सह खाली पडले. त्यामुळे आर्यन सोमेश्वर नैताम यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला .तसेच त्याचा मित्र रौनक नरेश राऊत यास गंभीर दुखापत झाली . फिर्यादी सोमेश्वर उर्फ कवडू विश्वनाथ नैताम वय 44 राहणार पोलीस स्टेशन अड्याळ च्या मागे यांच्या तक्रारीवरून आर्यन माझा मुलगा असून यांच्या मृत्यूस व त्याच्या मित्र रौनक यास गंभीर दुखापत होण्यास सर्वज्ञ ट्रॅव्हल्स नावाची मिनी बस क्रमांक एम एच 31 सी क्यू 69 91 च्या चालक कारणीभूत असल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय मेमो वरून ठाणेदार साहेब यांच्या आदेशावरून सदर गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला .दखल अधिकारी पोलीस हवालदार मंगेश बाबरे/,1052/आहेत तर तपास  पोलीस उपनिरीक्षक जयराम चव्हाण पोलीस स्टेशन अड्याळ यांच्याकडे आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कायमी -अप  क्रमांक व कलम 173/2025 कलम 281 ,106( 1 )125 (ब) भा न्या सं. सहकलम 184 मो .वा .का .अंतर्गत गुन्हा नोंद अड्याळ पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या