Ticker

6/recent/ticker-posts

"रात्रशाळेतील शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक वस्तूंचे वाटप "


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 मुंबई:-घरच्या परिस्थितीतून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या होतकरू, मेहनती, श्रमिक वर्ग आणि गृहिणींना मोफत शाळेय शिक्षण देण्यापासून उत्कृष्ट करियर मिळवून देण्यापर्यंत कार्यरत असणारी, सलग इयत्ता आठवी ते दहावीचा शंभर टक्के रिझल्ट देणारी आणि मेरीट टक्केवारीत नाव टिकवून ठेवलेल्या मुंबई, सायन (पुर्व) मधील जोगळेकर वाडी म्युनिसिपल शाळा संकुलमधील सुप्रसिध्द
"पद्मश्री आण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित" " *ज्ञानविकास नाईट हायस्कुल*" येथील वर्ष २०२५-२०२६ मधील रात्रशाळेमधील इयत्ता आठवी, नववी आणि दहावी नवोदित विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची अधिकाधिक गोडी वाढावी आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून  दि. १ जुलै २०२५ रोजी सन्माननीय प्रिन्सिपल परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक  वृंद आणि सामाजिक चळवळीतील समाजसेवकांमार्फत प्रत्येक इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यास शालेय पाठ्यपुस्तक संच, शैक्षणिक वस्तू (फॅन्सी पाऊच, पारदर्शक मोजपट्टी, खोडरबर, गिरमिट, पेन्सिल, एक जेल पेन, दोन बॉल पेन)
वाटप करण्यात आले. 

ह्यावेळी वर्गशिक्षक सुर्यवंशी सर, विज्ञानतज्ञ पोकळे सर, गणिततज्ञ अजित नाईक सर ह्यांनी आपापल्या इयत्ता आठवी, नववी आणि दहावी विद्यार्थांना पुर्व सुचना देऊन शिस्तबध्दता बाळगून रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक गोष्टी पुरवठा करून रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पाठबळ बनलेल्या मान्यवरांमध्ये ज्ञानविकास नाईट हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान मुख्याध्यापक प्रा. परदेशी सर, एबल एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा समाजसेविका सौ. अनुराधा गणेश बिंगी मॅडम, मासूम संस्थेच्या साऊथ झोन प्रोजेक्ट मॅनेजर स्नेहल गायकवाड मॅडम आणि 'भिमसैनिक संघटना' चे प्रतिनिधी समाजसेवक जितेंद्र कांबळे गुरुजी यांच्या हस्ते वाटप करताना सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता. 

ज्ञानविकास नाईट हायस्कुलमध्ये प्रवेश घेतलेल्यांपैकी काही परिवाराचा भार सांभाळणाऱ्या गृहिणी तर काही खाजगी नोकऱ्या करणारे व मनपामधील कर्मचारी तर काही कारखान्यामध्ये अंगमेहनतीचे काम करणारे मेहनत करणारे युवा तर काही परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडलेले तरुण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या इयत्ता आठवी, नववी आणि दहावी मधील होतकरू, मेहनती आणि श्रमिक वर्गामध्ये शिक्षणाची ऊर्जा निर्माण करून शालेय शिक्षण पुर्ण करण्यासाठी सर्व परिस्थितीची कोणतीही सबब न देता रात्रशाळा सुरू झाल्यापासून नित्यनियमाने आवर्जुन उपस्थित राहिलेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची रोजची उपस्थितीत आजही दिसत होती.

हि आज वाढत्या महागाईच्या काळात अशक्य गोष्ट आणि त्याहून कठिण म्हणजे अनेक दिवसांचा शिक्षणात गॅप पडणाऱ्यांनी चांगल्या मार्काने पास होणे, 
ह्या असाध्य गोष्टी सातत्याने पाच वर्ष शंभर टक्के रिझल्ट देणारी, रॉल ऑफ मॉडेल बनलेली ज्ञानविकास नाईट हायस्कुल आणि आदरणीय मुख्याध्यांपकसह शिक्षक वृंद यांचे परिश्रम आणि प्रसिध्दीची हाव न ठेवता शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहकार्य करणारे दानवीर समाजसेवक.

अशा वृत्ती़मुळेच मराठी रात्रशाळा टिकतील अन्यथा एक शाळा, एक भाषा, एक संस्कृती मिटण्यास वेळ लागणार नाही. म्हणून परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहित करा आणि शक्य असल्यास यथाशक्तीप्रमाणे शालेय वस्तू, शैक्षणिक साहित्य 
वाटप करून सामाजिक दायित्व भारतीय म्हणून करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या