विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज
नांदेड -: जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील बरेच कर्मचारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत कार्यरत आहेत, त्यामध्ये शिक्षकांचा भरणा जास्त आहे, नांदेड जिल्ह्यात बरेचसे शाळा,काॅलेज आहेत शासन मान्यता मिळाली आहे, आणि ते १००% अनुदानित आहेत त्या शाळा काॅलेज मध्ये बोगस दिव्यांगाची भरती झाले ली आहे, आणि ते आजवर दिव्यांग 2016 च्या कायद्या नुसार प्रत्येक योजनेचा लाभ घेत आहेत, सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या प्रकरणाबाबत आवाज उठवला बरेचदा मिडीया वाल्यांनी बातम्या झळकवल्या, तरीही या वर काहिच परिणाम झाला नाही, शिक्षण अधिकारी या सर्व प्रकरणात सामिल आहे त का? वर पर्यंत साखळी आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे,त्यांचे लागेबांधे एवढे मजबूत आहेत आणखी त्यांच्या वर कोणती ठोस कारवाई झालीच नाही शिक्षण मंत्र्यांना बरेच दा निवेदन दिले, पुरावेही सादर केले तरी कारवाई शून्य जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्या वर अन्याय होताना दिसत आहे, खर्या दिव्यांगांना वंचित ठेवले जाते हे शासनाचे अधिकारी आपलं उखळ पांढरे करून घेत आहेत, आरोग्य विभागात हि बोगस दिव्यांंगाची भरती झालेली आढळून आलेले आहे,हे बोगस लाभार्थी खर्या दिव्यांगांना वंचित ठेवून शासनाची लुट करत आहेत या गलिच्छ लोकांची शिक्षणमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून जे खरे दिव्यांग आहेत त्यांना शासकीय सेवेचा लाभ हक्क मिळवून द्यावा आणि ह्या बोगस दिव्यांंगावर कडक कारवाई करावी,, प्रहार दिव्याऺग सऺगठन नांदेड शहर अध्यक्ष, विजय चौडेकर,
0 टिप्पण्या