Ticker

6/recent/ticker-posts

लोककलावंतांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघठीत व्हावे; प्रा.गजेंद्र गवई

 कलावंत जोडो अभियांनाअंतर्गत जनजागृती प्रबोधन..

 हिंगोली प्रतिनिधी - श्रीकांत बारहाते              

हिंगोली :-"संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण भागात विविध लोककला सादर करणारे वंचित, शोषित, उपेक्षित लाखों लोककलावंत ज्यामध्ये गायक शाहिर, कीर्तनकार ,वारकरी,वादक , अभिनय, साहित्यिक, कवी, यांनी आपल्या विविध कलेद्वारे संस्कृती जतन करून पुढच्या पिढीला प्रबोधित करण्याचे काम करत आहेत परंतु हे सर्व लोककलावंत असंघठीत असल्याने शासन दरबारी त्याची दखल घेतल्या जात नाही त्यामुळे लोककलावंतानी आपल्या न्याय हक्कासाठी संघठीत व्हावे. "असे मत मौ. हिवरखेड ता. मेहकर येथे श्रावस्ती बुद्धविहाराच्या सभागृहात लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य या राज्य स्तरीय लोक कलावंत शिखर संघटनेच्या वतीने आयोजित कलावंत जोडो अभियान अंतर्गत प्रबोधन जनजागृती कार्यक्रमात व्यक्त केले.                 सदर कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी सरपंच गौतम मोरे होते तर प्रमुख उपस्थितीमार्गदर्शक राज्य समन्वयक प्रा. गजेंद्र गवई, उपसरपंच ताईबाई सरकटे, संघटक प्रा. केशव गवई,शाहिर जगाराव गवई, विजय जनार्धन गवई यांची होती.     कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमाचे पूजन करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.               याप्रसंगी लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य चे राज्य समन्व्यक प्रा. गजेंद्र गवई यांनी शासन दरबारी असलेल्या विविध योजना,वृद्ध कलावंत मानधन योजना, निकष, पात्रता व निवड प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करून उपस्थित कलावंत यांना गाव तिथे कलावंत शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले.सविस्तर माहिती दिली. 
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच माननीय गौतम मोरे, उपसरपंच ताईबाई सरकटे,अमोल मोरे,रामेश्वर मोरे, आकाश मोरे, गणेश मोरे,राहुल मोरे,दिलीप मोरे, कडुबा मोरे,रामभाऊ साळवे, दादाराव मोरे,प्रतीक गवई, शांताराम मोरे,सिद्धार्थ मोरे,वसंता मोरे,प्रवीण मोरे,दीपक साळवे,धम्मपाल मोरे,तुषार मोरे,मिलिंद मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मोरे यांनी केले तर आभार आकाश मोरे यांनी मानले.              कार्यक्रमास बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या