भारत तिबेट मैत्री संघातर्फे ९० वा जन्मदिन उत्साहात साजरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा-दलाई लामा केवळ एक व्यक्ती, एक विचार व एक बौद्ध धर्मगुरूच नाहीत तर जगात भारतीय संस्कृती ,नालंदा, परंपरा आणि अहिंसा व शांतीचा प्रचार व प्रसार करणारे तसेच जगाला युद्धाची नाही तर बुद्धाच्या करुणा व बंधुत्वाची गरज असल्याचे ठामपणे सांगणारे ते वर्तमानातील करुणेचे अवलोकितेश्वर बोधिसत्व व खऱ्या अर्थाने विश्वगुरू आहेत असे विचार भारत तिबेट मैत्री संघाचे राज्याचे अध्यक्ष अमृत बन्सोड यांनी व्यक्त केले.
भारत तिबेट मैत्री संघ भंडारा तर्फे सद्धम विहाराच्या सभागृहात १४ व्या दलाई लामा यांच्या ९० व्या जन्मदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष एम. डब्ल्यू. दहिवले तर प्रमुख अतिथी म्हणून भंडाऱ्याचे माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी होते. याप्रसंगी भंते शीलभद्र ,भाजपचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे,डॉ
परमानंद बागडे, अनिता नंदागवळी, रामकुमार गजभिये, धनंजय तिरपुडे, प्रा. डॉ. के .एल .देशपांडे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
दलाई लामा भारताला आपला गुरु तर स्वतःला भारताचा शिष्य मानतात .माझा शत्रू सुद्धा माझ्या करुनेचा उत्तराधिकारी आहे हा दलाई लामा यांचा विचार प्रत्येक देशांनी कृतीत उतरविला तर जगात बंधुभाव नांदून जग सुंदर होईल असे महेंद्र गडकरी म्हणाले.
दलाई लामा यांची मायभूमी तिबेटला १९५९ साली चीनने पूर्णतः गिळंकृत केले म्हणून दलाई लामा यांना भारताचा आश्रय घ्यावा लागला .त्यांच्याबरोबर तिबेट मधून ७५००० तिबेटी भारतात आले ,त्यामुळे त्यांनी भारतात धर्मशाळा येथे निर्वासित तिबेटी सरकारची स्थापना केली तेव्हापासून तिबेट मुक्ती बरोबरच जगात अहिंसक व शांततामय मार्गाने शांतता नांदावी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त इंजि.रूपचंद रामटेके व संजय घोडके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दलाई लामा यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त केक कापून आनंद साजरा करण्यात आला आणि त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभावे म्हणून सामूहीक मंगल कामना करण्यात आली.
तत्पूर्वी सकाळी ११ वाजता गोठणगाव येथील नोरग्यालींग तिबेटन सेटलमेंट येथे दलाई लामाचा जन्मदिवस मोठ्यो उत्साह व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी नायर , प्रोबेशनल आय.ए.एस. अधिकारी साईकिरन,एस. डी. ओ. वरूनकुमार, अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सेटलमेंट अधिकारी तेनजीन, लोकल सभापती
छयो गॅलसन, भारत तिबेट मैत्री संघाचे अमृत बन्सोड यांची विशेष उपस्थिती होती.
संचालन भारत तिबेट मैत्री संघाचे जिल्हा सचिव मोरेश्वर गेडाम यांनी केले तर आभार अध्यक्ष गुलशन गजभिये यांनी मानले .कार्यक्रमाकरिता सिद्धार्थ चौधरी, रामकुमार गजभिये ,महादेव मेश्राम, अनमोल देशपांडे, एड. डी. के. वानखेडे, महेंद्र वाहने, रमेश जांगडे ,असित बागडे, प्रशांत सूर्यवंशी, राजकुमार बन्सोड, आहुजा डोंगरे, , सचिन गभने, विजय सावध, अनिल पाटील, राजेश मडामे ,नितेश शहारे, ज्ञानचंद जांभुळकर ,लता करवाडे, शुभम नगराळे ,कल्पना ढोके ,अतुल रंगारी ,दिगंबर रामटेके, उपासराव खोब्रागडे, रवी पंचभाई, श्रीराम बोरकर, जया शिंगाडे, रवी ढोके, वाल्मीक डोंगरे ,धर्मशोक मेश्राम इत्यादींनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या