"माझा उद्योग, माझा व्यवसाय" – तरुणांसाठी सुवर्णसंधी!
चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : – अंधेरी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या वतीने "उद्योजक विकास कार्यशाळा" चे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तरुणांचा मार्गदर्शक, प्रेरणादायी व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आयु. विजय जाधव असतील. तसेच विशेष पाहुणे आयु. डॉ.वसंत तायडे, माजी प्राचार्य सिडनॅहम महाविद्यालय कॉलेज, मुंबई, स्पर्धा परीक्षा तज्ञ, आयु. राजेश कांबळे, उद्योजक तज्ञ व मार्गदर्शक व आयुष्यमती तृप्ती नारकर, परदेशातील विद्यापीठातील शिक्षण शिष्यवृत्ती तज्ञ हे उपस्थित राहणार आहेत. ते स्पर्धा परीक्षा, व्यवसाय उद्योग व परदेशातील विद्यापीठातील शिक्षण, शिष्यवृत्ती या बाबत सविस्तर मार्गदर्शन करतील
या कार्यक्रमातून तरुणांना आत्मविश्वास, दिशा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल.
पुढे होणाऱ्या कार्यशाळेतील विशेष बाबी - व्यवसायाची दिशा आणि संधी ओळखणे, मार्केट रिसर्च व स्पर्धात्मक रणनीती, बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट लेखन, बँक कर्ज, शासकीय योजना, UDYAM/MSME, AI नोंदणी, ब्रँड बिल्डिंग, विक्री कौशल्य, डिजिटल मार्केटिंग, संपूर्ण प्रात्यक्षिक व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात येईल.
वरील कार्यक्रम ११ जुलै २०२५, सायं. ५ वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, लोखंडवाला रोड, चार बंगला, अंधेरी (प.), मुंबई – 400053 येथे होईल.
हा उद्घाटन समारंभ विनामूल्य असल्याने इच्छुक उमेदवारांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन आयु.चंद्रकांत बच्छाव सरचिटणीस यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुकांनी भ्रमण क्रमांक 9137965218 / 8305535352 / 932448054 यावर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या