विजय चौडेकर जिल्हा प्रतिनिधी नांदेड चित्रा न्यूज
नांदेड :-धनेगाव ग्राम पंचायतीचे सदस्य शैलेंद्रसिंह हनुमानसिंह ठाकुर यांची नांदेड महानगर चिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली असुण महानगर अध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी ठाकुर यांचा सत्कार करून सन्मान केला.
शैलेंद्रसिंह ठाकुर गत तीन दशका पासुन भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पक्ष निष्ठ असलेल्या ठाकुर यांनी पक्षाच्या विविध पदावर काम करत नांदेड ग्रामीण भागात पक्ष वाढी साठी मोठे योगदान दिले आहे. सलग पंधरा वर्षा पासुन ठाकुर धानेगाव ग्रा.पं.चे सदस्य देखील आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने शैलेंद्रसिंह ठाकुर यांची नांदेड महानगर चिटणीस पदी निवड केली आहे.
त्यांच्या या निवडी बदल माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, खा. अजित गोपछडे, विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे,महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, सरचिटणीस शितल खांडील , माजी जिल्हा परिषद सदस्य मनोर पाटील शिंदे, मंडळ अध्यक्ष विश्वंभर शिंदे यांचे ठाकुर यांनी आभार मानले आहेत.
[सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,]
0 टिप्पण्या