Ticker

6/recent/ticker-posts

पिसाळलेल्या गाईच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू तर दोन महिला जखमी - पडोली येथील घटना.

 
मय्यत  व गंभीर जखमी महिलांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयाची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निवेदना द्वारे भारतीय कम्युनीस्ट पक्षाची मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : नेहमीप्रमाणे फिरायला जात असलेल्या घरासमोर एका मोकाट गाईने हल्ला चढवून यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि.१९ ऑगस्ट २०२५ ला पहाटे ५-०० वाजताच्या दरम्यान इंदिरा नगर पडोली येथे घडली.


याबाबत सविस्तर माहिती  अशी इंदिरा नगर पडोली येथील मय्यत  बेबी बापुराव भगत या पहाटे ५-०० वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे फिरायला जात असताना घरासमोर एका मोकाट गाईने मय्यत बेबी भगत हिच्यावर जोरदार हल्ला चढविला असता आजु बाजूला असलेल्या इतरही लोक व महिला मदतीला धावून गेले. परंतु हि गाय रॅबीजने पिडत असल्याने कोणालाही न जुमानता तिने चौफेर हल्ला चढवुन सिमा अरुळकर व कोमल कामडे यांना गंभीर जखमी केले आहे.
     यात बेबी बापुराव भगत हिचा जागीच मृत्यू झाला. व कोमल कामडे ही  गंभीर स्वरुपाची जखमी असुन दवाखान्यात उपचारासाठी भरती आहे.व सिमा आरुळकर यांना जास्त मार नसल्याने त्या थोडक्यात बचावल्याची माहिती आहे. 

 तरी या मय्यत झालेल्या बेबी बापुराव भगत व गंभीर जखमी असलेल्या कोमल कामडे यांचे दोन्ही कुटुंब अतिशय हलाखीचे  जिवन जगत असल्यामुळे त्यांना दुसरा कुठलाही आधार नसल्याने त्यांचे कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे.या परिस्थितीमुळे त्यांना शासनाचे कर्तव्य असल्यामुळे  या कुटुंबीयाना आर्थिक मदत म्हणून आपणा कडुन सानुग्रह अनुदान मय्यत बेबी भगत यांचे कुटुंबियांना पाच लाख रुपये व गभीर जखमी असलेल्या कोमल कामडे हिच्या उपचारा करीता तिन लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काँ. रविंद्र उमाटे, जिल्हा सचिव, काँ. राजु गैनवार जिल्हा सहसचीव माजी नगरसेवक, काँ.मल्लेश कमटम, काँ प्रकाश रेड्डडी जिल्हा कोषाध्यक्ष कम्युनीस्ट पक्ष यांचे नेतृत्वात जिल्हधिकारी व पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांना निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या