Ticker

6/recent/ticker-posts

गोवंशाची कत्तल केलेल्या आरोपी सह १लाख६०हजाराचा मुद्देमाल ताब्यातशिवनखेड ता.अहमदपुर येथील प्रकार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-हंडरगुळी येथिल जवळच असलेल्या शिवनखेड ता.अहमदपुर येथे दि२०-८-२५रोजी  राञी१०.३०वा.पाशासाब करीमसाब शेख याच्या लोखंडी पञाच्या गोठ्या समोर गोवंश जातीची अंदाजे वय २ ते ३ वर्ष वयाच्या कालवडीची कत्तल करुन तिचे मुंडके,पाय,छाती,पोट इ. अवयवाचे तुकडे करुन घेऊन जात असताना पोलिस आल्याची चाहूल  लागताच अंधाराचा फायदा घेऊन यातील पाच आरोपी पळून गेले.पण एक आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला असून त्याच्या जवळून कत्तल केलेल्या कालवडीचे मागचे २ पाय व इतर माॅंस तसेच कत्तलीसाठी वापरलेले हत्यार तसेच मोटार सायकली असा१,६०००.०० रु.चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे 
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,शिवनखेड येथील पाशा करीम शेख याच्या पञाच्या गोठ्यापुढे आरोपी अक्रमखान मोहदिनखान पठाण,कलीम आलीम बेग,शादुल बशीर डांगे,बबलू उस्मान शेख हे सर्व रा.शिवनखेड ता. अहमदपुर व जमीर सय्यद मंगरुळ ता.जळकोट आणि खलील मुसाशेख रा.वाढवणा बू.ता.उदगीर हे आरोपी आपापसात संगनमत करुन दि.२० रोजी राञी.२२.३० वा.२ते३वर्ष वय असलेल्या गोवंश कालवडीची धारधार हत्याराने कटाई केली.आणि तिचे पाय,मुंडके,छाती,पोट इत्यादी माॅंस घेऊन पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.माञ,यातील आरोपी अक्रमखान मोहदिनखान पठाण हा गोवंशाचे शिवक मांसासह पोलिसांने पकडला आहे.तसेच घटनास्थळावर मोटारसायकलींसह कत्तलीसाठी वापरलेले धारधार हत्यार ही मिळून आले आहे.अशी फिर्याद पोलिस हवालदार ज्ञानोबा पुंडलिक येमले (ब.नं.१२५२) यांनी दिली म्हणुन वरील आरोपींविरुध्द गुरनं व कलम ५७१/०२५ कलम ५,५ {अ},५ {क}, ९{ब} महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. १०७६(१९५५सुधारीत) सह कलम ३(५) भा.न्या.सं.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोनि.बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. श्रीमंगले हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या