Ticker

6/recent/ticker-posts

खानवाडी येथील शिक्षक नरेंद्र पखाले यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा :- आर्वि  पंचायत समिती अंतर्गत वर्धमनेरी केंद्रातील खानवाडी येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पखाले हे दि.३१जुलै ला सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त शाळेच्या वतीने त्यांचा ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष विलास ससोते व उपसरपंच वनिता धुर्वे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष विलास ससोते हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच वनिता धुर्वे, शाळेचे माजी मुख्याध्यापक अनिल सरोदे, ग्राम.शि.स.उपाध्यक्षा लता सूरपाम,वनिता रंधे,सौ.अंतूरकर , ग्राम पंचायत सदस्या निकिता पट्टे,उज्वला लांडगे,वैशाली सोनवने,मनिषा धुर्वे,आकरे सर,यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.उपस्थितांनी पखाले सर यांच्या कार्याचा गौरव करुन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आयोजन,संचलन व आभार प्रभारी मुख्याध्यापक आकरे सर  यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या