सोलापूर :-माढा तालुक्यातील अनेक मंडलात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके गेली होती. सावरण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मिळावी यासंदर्भात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने तत्कालीन माढा तहसीलदार ठोकडे मॅडम यांना निवेदन दिले होते. याचा पाठपुरावा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातुन शासन दरबारी करून माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना १३कोटी ७८ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून मंजूर करून घेण्यात आली आहे. याचे सर्व श्रेय भारतीय जनता पार्टी माढा तालुका यांना जाते. तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्या नेतृत्वात किसान मोर्चा तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रकाश कुलकर्णी, शंकर मुळुक, पांडुरंग राऊत, बिरूदेव शेळके, लाला झाडे, प्रमोद रोटे, सोमनाथ वाघमारे, विवेक कुंभेजकर, माया माने, संध्या कुंभेजकर, लेंडवे मेजर साहेब, नावजी अनभुले अर्जुन माने, अमोल देशमुख पडसाळीकर, लखन पवार तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या