Ticker

6/recent/ticker-posts

एक विशेष विद्यार्थी प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा  :-दादर गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, सायन येथील संविधान क्लब आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आज एक विशेष विद्यार्थी प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संविधान क्लबचे नव-निवडलेले सदस्य उपस्थित होते, ज्यात संविधान क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष रोहन उघाडे, उपाध्यक्ष सायमा खान, सचिव सैफ खान, कोषाध्यक्ष प्रिया शेट्टियार आणि तिसऱ्या वर्षाच्या राज्यशास्त्र वर्गाचे प्रतिनिधी प्रमुख नूरीन सोलकर व उपप्रमुख रोहिणी देवेंद्र सहभागी झाले.

या कार्यक्रमात प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष राज्यशास्त्रचे विद्यार्थी पत्रकार म्हणून सहभागी झाले.

या बैठकीचा मुख्य उद्देश संविधान क्लबच्या आगामी भविष्यासाठी, धोरणनिर्धारण, आणि नव-निवडलेल्या प्रतिनिधींच्या योजनांवर विचारविनिमय करणे हा होता. प्रेस कॉन्फरन्सदरम्यान क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना क्लबच्या आगामी उपक्रमांची, विद्यार्थी सहभागाची आणि संविधानाच्या महत्त्वाच्या वाढीसाठी प्रस्तावित योजनांची सविस्तर माहिती दिली.
ही प्रेस कॉन्फरन्स महाविद्यालयाच्या संविधान क्लबने आयोजित केली होती, ज्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारले आणि आगामी सत्रातील योजनांवर विचारमंथन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास, संविधानविषयक जागरूकता आणि संविधान क्लबच्या भविष्यासाठीच्या योजनांना बळ मिळाले.

कार्यक्रमाच्या यशासाठी आयोजक व सहभागींचे आभार मानण्यात आले. प्रा. सुमित खरात आणि प्रा. अनिकेत उबाळे यांनी असे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आणि जागरूकता वाढवणारे असल्याचे सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या