चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-सिने जगातील महान पार्श्र्वगायक स्व.मो.रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त *एक शाम रफी के नाम* संगीतमय कार्यक्रम नुकतेच सार्वजनिक वाचनालय गांधी चौक भंडारा येथे साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय जी दलाल तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित महादेव पाटील(सहा.पोलिस निरीक्षक_सायबर सेल)भंडारा,डॉ.मधुकर रंगारी_ जनरल सर्जन,डॉ.मनीष येरपुडे,राजू आगलावे पत्रकार _ (दैनिक _प्रहार न्यूज ),मुकेश माटे (ऑर्गनायझर)! ई मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
,लियाकत खान,अनिल बहाद्दूरे,वहाब खान,नरेश हर्देनिया,प्रवीण उजवने, सौ.नीलिमा(नसरीन) ई.गायक कलावंतांनी मो रफी साहेबांच्या गिताद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमाचे आयोजक मुकेश, माटे,धनराज माटे हे होते.मोठया संख्येने उपस्थित श्रोत्यांनी गायक कलावंतांच्या गायनाला भरपुर दाद दिली.
सूत्र संचालन लियाकत खान यांनी केले.वाचनालय येथे आयुतत्व आयुर्वेदिक व पू पंचकर्म केंद्राचे संचालक डॉ.मनीष येरपुडे यांचे तर्फे सायं 5 ते 7 पर्यंत मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबिर घेण्यात आले होते.


0 टिप्पण्या