चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बस स्थानक अभियान संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यातील सर्वांत स्वच्छ व सुंदर बस स्थानक निवडण्याच्या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्हा बस स्थानकाची पाहणी आणि मूल्यांकन राज्यस्तरीय निरीक्षण पथकाद्वारे करण्यात आले.
या निरीक्षण पथकात श्रीमती अनघा बारटक्के (प्रादेशिक व्यवस्थापक, रा.प. छत्रपती संभाजीनगर), श्री अशोक पन्हालकर (प्रादेशिक अभियंता, रा.प. छ. संभाजीनगर), मो. सईद शेख (पत्रकार व प्रचार प्रमुख, ग्राहक पंचायत समिती, भंडारा जिल्हा), राजेश पांडे (सहसचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत) यांचा समावेश होता.
या वेळी श्री संदीप खवले (यंत्र अभियंता, रा.प. भंडारा), श्री पराग शंभरकर (कामगार अधिकारी), श्रीमती सारिका लिमजे (आगार व्यवस्थापक), श्री धुर्वे (सहाय्यक यंत्र अभियंता, एस.टी. विभाग, भंडारा) हेही उपस्थित होते.
अंतिम निरीक्षणानंतर बस स्थानकाच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या अभियानामार्फत प्रवाशांना स्वच्छ आणि सुसज्ज परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भंडारा जिल्हा बस स्थानक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी एस.टी. विभाग आणि स्थानिक प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात असून विविध बस स्थानकांचे निरीक्षण व मूल्यांकन केले जात आहे. विजेत्या बस स्थानकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १ कोटी रुपयांपर्यंतचे पारितोषिक दिले जाईल.
या अभियानाचा उद्देश बस स्थानकांची गुणवत्ता सुधारणे आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.


0 टिप्पण्या