Ticker

6/recent/ticker-posts

भंडाराऱ्या ची शान,ऐतिहासिक अमूल्य ठेवा पांडे महाल नष्ट होण्याच्या मार्गावर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-शहराला ऐतिहासिक वारसा म्हणून लाभलेला भव्य_ दिव्य असा पांडे महाल हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून हा अमूल्य ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.नुकतेच या महालातील देवघर च्या बाजूला असलेल्या इमारतीचे मोठे भाग काही दिवसापूर्वी खाली तुटून पडल्याचे दृश्य पहावयास मिळाले, या कोसळलेल्या भागाची, व अवशेष ची पाहणी नुकतीच ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थेकडून करण्यात आली.जर तात्काळ पुरातत्व विभागाने गंभीरतेने या एतिहासीक स्थळाचे संरक्षण केले नाही तर हा अमूल्य ठेवा लवकर नामशेष होणार. पांडे परिवाराशी जवळीक असलेले
संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सईद शेख यांनी या बाबत माहिती देताना सांगितले की _भंडारा शहराची शान श्रीमंत यादवराव पांडे यांनी १८२० साली हा महाल बांधला.यादवराव पांडे आणि गणपतराव पांडे हे भोसले व इंग्रर्जांच्या काळात सुभेदार, ९६ गावाचे मालगुजार होते. महाला प्रमाणे एक चांगले ,उत्कृष्ट असे निवास असावे या कल्पनेतून त्यांनी मुरुमाच्या दगडावर, पायऱ्या वर विटा,चुन्याचा वापर करून भंडारा येथे भव्य महाल उभा केला.
 शंभरावर खोल्या,महालाचा प्रवेशद्वार इतका उंच की ज्याचा अंबारी ठेवलेला हत्ती जात असे.प्रवेशद्वार हा लाकडाचा अत्यंत वजनी,उंच .उघडणे,बंद करण्याकरीता २५ ते ३० माणसे लागतील असा .
सुंदर व आकर्षक आकाशकंदील,नक्षीकाम, सागवानी, शिशंम चे मोठाले खांब,विदेशातून आणलेल्या काचेच्या हंड्या, झुंबरे,लाकडाचे नंदी बैल,हत्ती,घोडे,इटालियन मार्बल,टाइल्स,बेल्जियम चे भव्य आरसे,संगमर्मर च्या फरश्या,निवास स्थान,खिडक्या,तावदाने, निळे _लाल काचेच्या खिडक्या,गवाक्ष,फाऊंटन सर्व काहीअद्भुत.यादवराव,गणपतरव हे नृत्याचे शौकीन असल्याने येथे रांगमहालात प्रसिद्ध नृत्यांगना महेताब जमा ही रंगमंचावर समोर असलेल्या भव्य आरश्यात स्वतः ची अदा न्ह्याळत नृत्य करीत असे.

विश्र्वप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांचे लंडन येथून विकत आणलेले प्रसिद्ध चित्र व पेंटिंग येथील आकर्षणात भर घालते.
पांडे कुटुंब परम गणेश भक्त. त्यांनी ९० वर्षापूर्वी पितळा चे आकर्षक, बिल्लोरी काच लावलेले देवघर येथे गणेश स्थापना केली आणि दरवर्षी गणेश ची स्थापना काळात येथे भंडारा व परिसरातील नागरिकांची अलोट गर्दी असते.
वरच्या मजल्यावर लॉन टेनिस व बॅडमिंटन खेळण्याची व्यवस्था असायची.पांडे परिवार कडून दरवर्षी गायमुख देवस्थान येथे शिवरात्रीला जत्रे निमित्त व्यवस्था केली जाते.
पांडे कुटुंब नागपूर येथे राहत असल्यामुळे पांडे महाल उपेक्षित आहे,नागपूर येथून पांडे महाल ट्रस्ट चे प्रबंधक श्री आनंद पांडे सध्या महालाची देखभाल करीत आहे.सध्या गणेश स्थापना असल्याने महालातील गणपती पाहणाऱ्यांची गर्दी असते.
हा अमूल्य ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.महालाचा काही भाग भरभरून पडल्याने महालाची स्थिती अत्यंत बिकट आहे,.ग्रीन हेरिटेज संस्थेने अनेकदा महाराष्ट्र शासनास या वास्तूस संरक्षित स्मारक घोषित करण्यास पाठपुरावा करून पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां ना इथे अनेक वेळी पाचारण केले, मा.मुख्यमंत्री,सबंधित मंत्री ई ना पत्र लिहिले,पत्राचे उत्तर ही मिळाले पण या ऐतिहासिक व भंडाऱ्याची शान असलेल्या वास्तूस जपून संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले नाही,ही एक मोठी शोकांतिका आहे,असे संस्थे चे मो सईद शेख यांनी आपली व्यथा मांडली. ही वास्तू ,हा अनमोल ठेवा शीघ्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.


.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या