Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांची कारवाई


 ट्रॅक्टर व रेतीसह चार लाख पाच हजारांचा मुद्देमालासह दोघांना अटक.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : तालुक्यातील मानोरा फाटा गावाजवळ अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांनी कारवाई करुन चार लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शनिवार दि.३० ऑगस्ट २०२५ ला पहाटे चार वाजताच्या सुमारास मांगली नाल्यातून अवैधरीत्या रेती काढून भद्रावतीकडे आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मांगली रोडवर ट्रॅक्टर येताना दिसताच थांबवून विचारपूस केली असता वाळू वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे आढळले. चौकशीत ही रेती मांगली नाल्यातून आणल्याची कबुली दिली.
पोलिसांनी सदर कारवाईदरम्यान पाच हजार रुपये किंमतीची रेती, तस्करीसाठी वापरलेले महिंद्रा ४७५ कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर (एमएच २९ व्ही १७१३) व ट्रॉली किंमत ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी ट्रॅक्टर मालक अक्षय अशोक बोडेकर व ड्रायव्हर राजू पुरुषोत्तम शिरपूरकर (रा. मांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी वरोरा संतोष बाकल, ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. प्रियंका गेडाम, पो.ह. जगदीश झाडे,विजय उपरे, संतोष राठोड,योगेश घुगे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या