चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-आजच्या युगाचे धन्वंतरी आयुर्वेदाचार्य श्रद्धेय आचार्य बाळकृष्ण महाराज जी यांच्या जन्मदिवस निमित्त *जडीबुटी दिवस आणि*एक पेड मां के नाम* कार्यक्रम महिला पतंजली आणि मा शारदा योग वर्गाच्या वतीने शारदा मंदिर (संत कबीर वार्ड) च्या हिरवळीवर साजरा करण्यात आला.या प्रसंगी हवन वृक्षारोपण तसेच वनौषधी रोपट्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला महिला जिल्हा प्रभारी वैशाली गिऱ्हेपुंजे तसेच जिल्हा कार्यकारणी उपस्थित होती. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित ग्रिन हेरिटेज चे सईद शेख यांनी कार्यक्रमासाठी वनौषधी वृक्ष रोपटे उपलब्ध करून दिले होते.त्यांचे शाळ, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभाग चे विभागीय वन अधिकारी श्री लक्ष्मण आवारे , श्री आर टी मेश्राम वनपाल( कारधा नर्सरी ) यांचे ही याकरिता सहकार्य लाभले. कार्यक्रमाला अनिता खेडीकर, हर्षा बावनकर, अनिता टोपरे, ललिता साखरकर ,देविका बावनथडे ,चेतना कुबडे,पिंकी साखरकर, आशा गिरीपुंजे, माधुरी वाघमारे, सीमा गभणे, पूजा वाघमारे ,हेमलता घारड, बबीता गिरीपुंजे,ममता,प्रिया भिवगडे ,रिता डोरले, वंदना खरवडे ,ज्योती पटले ,प्रिया भिवगडे, उर्मिला कारेमोरे, कल्पना चांदेवार, मंजुषा डवले, जया निखार ,सारिका मानकानी तसेच पतंजली परिवारातील शरदजी खरवडे उपस्थित होते.
0 टिप्पण्या