Ticker

6/recent/ticker-posts

डोणगाव येथे आठ दिवस सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न....


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :-  तालुक्यातील डोणगाव येथे सालाबादप्रमाणे सलग आठ दिवस चालू असलेला अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.
        अखंड हरीनाम सप्ताहाचा प्रारंभ सोमवार दि. 28/07/2025 रोजी झाला, तर सांगता दि. 04/08/2025 रोजी झाली. प्रत्येक दिवशी कीर्तनकार ह. भ. प. महाराज वेगवेगळे होते. तर अन्नदाते देखील सात दिवस वेगवेगळे वस्ती वरील  होते.
     दैनंदिन कार्यक्रम - सकाळी 8 ते 9 शिवलीला अमृत व ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रज्ञान,9 ते 10 नाष्टा, 5 ते 7 हरिपाठ, 7 ते 9 भोजन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, 11ते 4 हरिजागर, पहाटे 4 ते 6 काकडा भजन.
       आज सकाळी  8 ते 10 वा. पालखीची गावामध्ये वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी डोणगाव ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
        त्यानंतर 10ते 12 ह. भ. प. आकृर महाराज साखरे यांचे काल्याचे जाहीर किर्तन झाले. 12 नंतर काल्याचा महाप्रसाद झाला. सलग आठ दिवस चालू असलेल्या कीर्तनाचा डोणगाव ग्रामस्थांनी, माता भगिनींनी आनंद घेतला. व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या