Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पोलिसांनी चोरीला गेलेले सोने मुळमालकाला केले परत

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-नळगीर ता.उदगीर येथील रहिवाशी दिलीप पंढरीनाथ सुकणे यांचे २.५ तोळे सोने अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते.याची गुरजिनं.२९३/२३ नुसार पो.स्टे.वाढवणा येथे तक्रार दाखल केली होती.म्हणुन या चोरीचा तपास करुन सपोनि.सुनिल पी. गायकवाड यांनी नुकतेचे हे सोने उपविभागीय पोलिस अधिक्षक अरविंद रायबोळे यांच्या हस्ते मुळ मालक दिलीप सुकणे यांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी सौ.सुकणे,पोउपनि.हालसे आदीजण उपस्थित होते.
पईपई करुन विकत घेतलेले सोने चोरीला गेल्याने सुकणे दांपत्य चिंतेत होते.पण सपोनि.गायकवाड यांनी ते परत मिळवून दिल्याने पोलीसांचे आभार व कौतूक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या