लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :- मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे उपोषणास बसले असताना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हदगाव तालुक्यातील हडसणी येथील दत्ता पाटील हे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते सतत पाच दिवस आमरण उपोषण करून सरकारकडून मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटलाचा उपोषण संपल्यानंतर दत्ता पाटील यांनी उपोषण सोडले व हे आंदोलन यशस्वी झा.यानंतर ते प्रथमच हिमायनगर येथे आले असता सकल मराठा बांधवांच्या वतीने परमेश्वर मंदिर येथे त्यांचा यथोचित्य सत्कार करण्यात आला. या समयी वामनराव पाटील मिराशे बालाजीराव ढोणे भोयर काका अजय माने माधव पाटील कदम करंजीकर सचिन पाळजकर असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते


0 टिप्पण्या