चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा- मेहकर येथील वैद्यकिय क्षेत्रातील देवमाणुस मेहकरचे सुप्रसिध्द डॉ.विजय चऱ्हाटे साहेब यांना महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्ताने पूरस्कार जाहिर करण्यात आला आसता तो सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते सोपानदादा देबाजे हे होते. तर आंबेडकरी चळवळीचे नेते भाई कैलास सुखधाने याप्रसंगी आपल्या छोट्याखानी भाषणातून म्हणाले डॉक्टर पेशा हा लोकांना जीवदान देणारा असून या पेशामध्ये प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा असतो. रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असे मानून आपले सर्वस्व समाज हितासाठी जोपासणारे डॉ.विजय च-हाटे साहेब वैद्यकीय क्षेत्रातील अनमोल हिरा आहे. त्यांचे आपण जतन केले पाहिजे असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रमुख मार्गदर्शक प्रा. डि. एस. वाघ, सुरेश मानवतकर, दादासाहेब गवई, सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यत करत साहेबांना त्याच्या कार्याला सर्व उपस्थितीतांनी शुभेच्छा दिल्या..
यावेळी, आंबेडकरी चळवळीचे युवा नेते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, कुणाल माने, गौतम नरवाडे, संदिप राऊत, राधेश्याम खरात, प्रदिप कांबळे, प्रभाकर आव्हारे, शरद खरात यावेळी समस्त मान्यवर उपस्थित होते


0 टिप्पण्या