चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत वनोजा (देवी) येथील झुंजार तडफदार प्रत्येक सामजिक कार्यात अग्रेसर राहणारे युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते रोशन शिंदे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
दि.०६ /०९/२०२५ ला ग्रामपंचायत वनोजा (देवी) येथील सरपंच डिमन टोंगे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव सैय्यद शेख यांच्या प्रमुख उपस्थित गावातील नागरिकांच्या सर्वानुमते रोशनी शिंदे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिन विरोध निवड करण्यात आली. यांच्या नियुक्ती करीता सुचक म्हणून अमोल गेडाम यांच्या सुचनेला अनुमोदन बंडु टोंगे यांनी दिले.
यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्खेने उपस्थित होते. रोशन शिंदे यांच्या नियुक्ती बध्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत पुढिल कार्याच्या वाटचालीस भरभरुन शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थिताचे आभार प्रशांत भंडारी उपसरपंच वनोजा (देवी) यांनी मानले.
0 टिप्पण्या