Ticker

6/recent/ticker-posts

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन !


चित्रा न्युज प्रतिनिधी 
बुलढाणा :-तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे व माजी सैनिक यांचा विशेष सन्मापत्र व पदक देऊन सन्मान करण्याचे आयोजन केले जाणार असून प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन मुख्य आयोजक आंबेडकरी चळवळीचे युवा नेते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी केले आहे. शैक्षणिक, साहित्य, कला, पत्रकारिता, युवा कार्यकर्ता, सामाजिक व राजकिय कार्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींनी आपला प्रस्ताव खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावा, किंवा खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा, सदर प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख 30/सप्टेंबर/2025 अंतिम तारीख आहे, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना मेहकर जनसंपर्क कार्यालय मु.पो. मिलींद नगर वार्ड नं.19, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा पिन. नं-443301, व्हाट्सअप नंबर- मो.9970467141,9881199852 या नंबरवर किंवा पत्त्यावर आपला प्रस्ताव पाठवावेत. सदर पुरस्कार हा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मेहकर येथील डाँ. बाबासाहेब आंबेडकर अशोका हाँल मेहकर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये वितरित केले जाणार आहे, पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे, आकर्षक ट्रॉफी, मेडल, सन्मानपत्र, शाल, थोर महापुरुषांच्या जिवनावर चारित्र्य पुस्तक असणार असून पात्र असलेल्यांनी प्रस्ताव पाठवावेत, सदर पाठवलेल्या प्रस्तावासाठी समितीचे सदस्य निर्णय घेणार आहे. यामध्ये कुणाल माने, शाहिर संघपाल गवई, राधेश्याम खरात, संदिप राऊत, लक्ष्मीताई कस्तुरे, प्रतिभाताई गवई, आसमा आत्राम, जाकेरा बी शेख आशी सुद्धा माहिती मुख्य आयोजक आंबेडकरी चळवळीचे युवा नेते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या