चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-सायन येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व संविधान क्लबच्या संयुक्त विद्यमाने प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील ऐतिहासिक मुंबई उच्च न्यायालयाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.
या दौर्यात विद्यार्थ्यांनी न्यायालय कसे कार्य करते, वकील कशाप्रकारे युक्तिवाद करतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच उच्च न्यायालयाचे ऐतिहासिक महत्त्व आणि न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा यांचा थेट परिचय झाला.
भ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध न्यायालयीन कक्ष कोर्ट रूम्स पाहिले व चालू न्यायप्रक्रिया जवळून समजून घेतल्या. याशिवाय माननीय न्यायमूर्तींच्या वाचनालयाला (Hounerable Judges’ Library) तसेच हायकोर्ट संग्रहालयालाही भेट देण्याची संधी मिळाली.
या शैक्षणिक उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना माननीय न्यायमूर्ती व अधिवक्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. या संवादातून त्यांना न्यायप्रक्रिया, घटनात्मक जबाबदाऱ्या व विधिक परंपरा यांचे सखोल ज्ञान मिळाले.
या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुमित खरात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर संविधान क्लबचे समन्वयक प्रा. अनिकेत रविंद्र उबाळे यांनीही सक्रिय भूमिका बजावली.
महाविद्यालय व्यवस्थापन व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की शिक्षणाबरोबरच अशा प्रकारचा प्रत्यक्ष अनुभवविद्यार्थ्यांसाठीआयुष्यभरउपयोगीठरेल आणि घटनात्मक मुल्यांबद्दलची त्यांची निष्ठा अधिक दृढ करेल.”
0 टिप्पण्या