Ticker

6/recent/ticker-posts

आंबेडकरी चळवळ व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने महाकवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त भव्य सत्कार व कलावंत मेळावा संपन्न..!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
मेहकर :-येथे आंबेडकरी चळवळ व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव 2025 मध्ये शेकडो कलाकार आणि धम्म बांधवाच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपनराव देबाजे होते तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून भाई कैलास सुखधाने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डि. एस. वाघ साहेब, कार्यक्रमाचे आयोजक तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई तर प्रमुख उपस्थितीत विजय मोरे साहेब, एस. बी. गवई, विजय खिल्लारे साहेब, हिम्मतराव सरकटे साहेब, दादासाहेब गवई, सुरेश मानवतकर, प्रकाश अंभोरे, बबन वानखेडे साहेब, मोहन अंभोरे, भास्कर गवई, रविद्र वाघ, गजानन सरकटे, प्रकाश सुखधाने तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेहकर येथे भव्य दिव्य आशा वामनदादा कर्डक जयंती कार्यक्रमात समाजसेवेचे व्रत घेऊन कार्य करणारे धम्म बांधव जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालताना एकत्र येऊन मानसन्मान करतात, वेगवेगळ्या राजकीय पक्ष मध्ये विविध पदावर राहून समाजसेवा करतांना समाज बांधवा वर होणार्या अन्याय, अत्याचार साठी एकजुटीने शासन दरबारी लढतात, प्रसंगी कायदा हातात घेतात, गुन्हे दाखल होतात, तरी ही घरदार विसरून समाज जोडण्याचे कार्य करतात, धम्म कार्य वाढविण्यासाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करतात, अन्याय अत्याचार दूर करतात आश्या महत्वपूर्ण, आदर्श, विनयशील बांधवाना महामानवाच्या नावाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले तर कलावंताना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर सर्व कलावंतानी आपल्या बहारदार गित गायणातून मेहकर शहर परिसर दणदणीत केला.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेने विशेष सहकार्य  राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. कुणालभाऊ माने, महाराष्ट्र युवक प्रदेश कार्याध्यक्ष मा. राधेशाम खरात, वाशिम जिल्हा अध्यक्ष मा. संदिपभाऊ राऊत, विदर्भ विभाग महासचिव मा. राजकुमार ऊचित, महिला आघाडी राष्ट्रीय युवती अध्यक्ष आसामा आत्राम, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सौ. लक्ष्मीताई कस्तुरे, राष्ट्रीय सचिव सौ. कांचन मोरे, राष्ट्रीय सहसचिव सौ. प्रतिभाताई गवई, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जाकेरा बी शेख तसेच मेहकर येथील आंबेडकरी चळवळ व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व महाराष्ट्र राज्यातील कलावंत व धम्म बांधव व मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या