चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-ईद-ए-मिलाद या पवित्र पर्वानिमित्त तकिया जुनी मशीद आणि गोल्डन ग्रुप यांच्या वतीने मुलांची नात-ए-पाक आणि धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.
सुमारे २५० मुलांनी मशिदीतील नात-ए-पाक कार्यक्रमात उत्साहाने नात , तकरीर,भाषणे सादर केल्या. यात तकियातील ३ मशिदीतील मुले सहभागी झाली होती. ९ मकातिब (मदरशां)तील मुलांनी यात सहभाग घेतला. अलीशा अकिल, हुजैफा कशफ, रुजान रिजवान, अफीरा हाफिज न्याज आदींनी उत्कृष्ट नात-ए-पाक, तक्रिर सादर केली.
दुसऱ्या दिवशी मुलांच्या आणि वृद्धांच्या धाव_ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये—
पहिल्या गटात
प्रथम – आयशा मुजम्मिल सैयद
द्वितीय – बरीरा ईशाद खान
तृतीय – अलीशा अकिल शेख
दुसऱ्या गटात
प्रथम – जुनैरा नौशाद खान
द्वितीय – हीफजा सिराज शेख
तृतीय – सफिया मुजम्मिल सैयद
तिसऱ्या गटात
प्रथम – जकवान इर्शाद खान
द्वितीय – सैयद आराज अली
तृतीय – सैयद अराफिल जाहिद अली
चौथ्या गटात
प्रथम – फायजा मुजम्मिल सैयद
द्वितीय – आयशा अर्शद शेख
तृतीय – मो. बिन बुशरान
६० वर्षांवरील गटात
प्रथम – लियाकत खान
द्वितीय – सोहेल खान यांनी प्राप्त केले . लहान मुलांबरोबरच,त्यांचे वडील तर कुणाचे आजोबा ही धावले.
या प्रसंगी मशिदीचे इमाम जनाब मो. फय्याज खान, मो. सलीम अन्सारी (संयोजक – गोल्डन ग्रुप), ग्रीन हेरिटेजचे संस्थापक मो. सईदभाई शेख, हाफिज नौशाद खान, सोहेल खान, तौसीफ पटेल, अनस पटेल, युसुफ खान, बुशरान खान, मलिक सिद्दीकी, लियाकत खान, जैनुद्दीन मिर्झा सर, इंजी. साजिद काजी, मो. सिराज शेख, तसेच तौसीफ अकिल खान, अवेश खान, रिजवान राशिद खान, नन्हू मलिक, शम्मू मिर्झा, पप्पन भाई, हामिद भाई, सैयद जावेद, सैयद मोहसिन, समीर खान आदी मान्यवर तसेच मुलांचे पालक उपस्थित होते.
या वेळी मशिदीचे इमाम जनाब मो. फय्याज खान म्हणाले, “अशा प्रकारच्या आयोजनांमुळे समाजात एकता, भाईचारा, सद्भावना टिकून राहते आणि मुलांचे मनोबल वाढते. अभ्यासासोबत धावण्याच्या स्पर्धेमुळे त्यांना प्रोत्साहन मिळून शारीरिक विकासास मदत होते.”
स्पर्धेतील विजेत्या मुलांना मान्यवर अतिथींच्या हस्ते रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मा. जिल्हा प्रतिनिधी / वार्ताहर
0 टिप्पण्या