Ticker

6/recent/ticker-posts

करंजी येथील मराठा बांधवाकडून दोन हजार पुऱ्याचे पार्सल मुंबईसाठी रवाना



 लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड                        

 नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील करंजी या गावातून मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे समाज बांधव आंदोलनासाठी थांबलेले आहेत त्यांची खाण्यापिण्याची खूप गैरसोय होत आहे ही गैरसोय होऊ नये म्हणून गाव खेड्यातील माता भगिनींनी व समस्त महाराष्ट्रातील ज्यांचे मुंबईला जाणे झाले नाही त्यांनी विचार विनिमय करून त्यांची खाण्यापिण्याची हालअपेष्टा होऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्यातून आपल्या जमेल त्या परीने मदत तिथे पाठवावी असे आवाहन तेथील समाज बांधवांनी केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत करंजी येथील मराठा सेवकांनी 2000 पुऱ्याचे संकलन करून मुंबई येथे पार्सल पाठविण्यात आले आहे त्या समयी उपस्थित मराठा सेवक परमेश्वर सूर्यवंशी चंद्रकांत कदम सचिन जाधव दत्ता पाटील गणेश देवराय बाबुराव माने पंढरी कदम सोनारी येथील उपसरपंच शेख युनुस भाई हे सुद्धा उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या